सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

विद्रोह का ढोंग?

विद्रोह का ढोंग ?

------------------------

जसे म्हणतात की पैशांचा आव आणता येत नाही, तसेच जीवनात ढोंग फार काळ लपत नाही.

जेव्हा नेमाडे म्हणतात की बरे झाले माझी मुले आधुनिक शिकली व कमावती झाली, नाही तर अजून प्राध्यापकीत “पसायदान” शिकवीत बसली असती तेव्हा त्यांचा ज्ञानेश्वरांविरुद्धचा विद्रोह नाही तर आधुनिकतेची मोहिनी जास्त प्रकर्षाने दिसते व मग स्वतः ते आयुष्यभर “पसायदान” शिकवीत बसले ते कसे ढोंग होते हे पुढे येते.

म्हणजे पहा, ह्यांच्या सांग्विकराने सर्व प्राप्त रूढीविरुद्ध विफल व्हावे आणि ह्यांनी मात्र सर्व डावपेच वापरत यश कमवावे, कोसलाला अपार यश मिळावे, ज्ञानपीठ मिळवावे,  हा काही दुर्विलास नव्हे तर चक्क हे ढोंग आहे. अर्थात त्यांना मुभा आहे की ते पांडुरंगावर ढोंगीपण ढकलू शकतात.

मराठीतले प्रसिद्ध भाषाशास्त्री अशोक केळकर ह्यांनी कोसला वर अभिप्राय देताना मोठे मर्मज्ञ विवेचन केले आहे. ते खाली वाचा :

 "लेखकाचे माप ह्याप्रमाणे त्याच्या पदरात घातल्यावर ( म्हणजेhaving given the devil his due असं मला म्हणायचं होतं ) आपल्याला एक भयानक शंका ग्रासू लागते. पांडुरंग सांगवीकर अखेर निमित्तमात्र. ज्या मृतांचे धर्म निरूपावयाचे आहेत ते शंभरातले नव्व्याण्णव नव्हे. तर स्वत:ला मृत ठरवणारे एक--जीवनमृत. कादंबरीच्या मीच्या आतला मी--गिरधर. ज्याला "स्वदेशबंधु त्याज्य : स्वग्रामबंधु त्याज्य ; संबंधित : यांचा संबंधु : तो विशेषत: त्याज्य, "ज्याला घरी राहणे दिवसेंदिवस जड होते, काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म.
 अनुभवाचे विघटन, त्याचे "वगैरे"करण ही नुसती सुरुवात, जमीनीची नांगरट. त्यात पेरणी करायची, ती आपण एकटे आहोत, काम्युने चितारलेला outsider आहोत, ए.ई.हाउसमनने व्यक्तविलेल्या " a stranger and afraid, In a world I never made" ह्या जाणिवेची. आधुनिक मानवाच्या विचार-कल्पनाविश्वातली ही एक महत्वाची जाणीव. हिची जातकुळी एकीकडे शेक्स्‌पियरच्या हॅम्लेटपर्यंत पोचते; दुसरीकडे बौद्ध, जैन, ह्यांच्यापर्यंत. आधुनिक मराठी साहित्यापुरते म्हणायचे तर मर्ढेकरांचे नाव सुचते . पण मर्ढेकरसुद्धा एक आनंदी, आशावादी प्राणी होता असे तुलनेने वाटावे इतके हे दुखणे विकोपाला गेले आहे.
 माणसाला संवेदनक्षमता जरूर असावी. पण तो अवघा संवेदनाच होऊन गेला, "सम्‌" जाऊन वेदनाच शिल्लक राहिली, तर ज्या विश्वाची चिंता करायची त्या विश्वाशीच संबंध तुटतो---"जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे".
आता ह्या केळकरांच्या अभिप्रायाचा काय अर्थ निघतो ? एक तर सॅलिंजरची कादंबरी निवेदन शैलीने जास्त यशस्वी आहे व "कोसला" नाही . कारण नेमाडेंना काय सांगायचे आहे तेच डेंजरस ह्या अर्थी गंभीर आहे. आणि दुसर्‍या परिच्छेदात ते कसे चूक आहे ते दाखविले आहे. एकटेपणाची जाणीव जरी वैश्विक असली तरी "काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म" ही विचारसरणीच कशी चूक आहे ते केळकर एका उदाहरणाने सांगत आहेत. एखाद्या पक्षाने घरटे ( कोसला ) बांधावे पण स्वत: मरून जावे तशीच ही नेमाडे सांगताहेत ती जाणीव आहे. ह्यापेक्षा तिखट अजून कोण लिहिणार आहे नेमाडेंच्या "कोसला"-पद्धतीच्या विचारांवर ?

विद्रोह का ढोंग ?

विद्रोह का ढोंग ? ------------------------ जसे म्हणतात की पैशांचा आव आणता येत नाही, तसेच जीवनात ढोंग फार काळ लपत नाही. जेव्हा नेमाडे म्हणतात की बरे झाले माझी मुले आधुनिक शिकली व कमावती झाली, नाही तर अजून प्राध्यापकीत “पसायदान” शिकवीत बसली असती तेव्हा त्यांचा ज्ञानेश्वरांविरुद्धचा विद्रोह नाही तर आधुनिकतेची मोहिनी जास्त प्रकर्षाने दिसते व मग स्वतः ते आयुष्यभर “पसायदान” शिकवीत बसले ते कसे ढोंग होते हे पुढे येते. म्हणजे पहा, ह्यांच्या सांग्विकराने सर्व प्राप्त रूढीविरुद्ध विफल व्हावे आणि ह्यांनी मात्र सर्व डावपेच वापरत यश कमवावे, कोसलाला अपार यश मिळावे, ज्ञानपीठ मिळवावे, हा काही दुर्विलास नव्हे तर चक्क हे ढोंग आहे. अर्थात त्यांना मुभा आहे की ते पांडुरंगावर ढोंगीपण ढकलू शकतात. मराठीतले प्रसिद्ध भाषाशास्त्री अशोक केळकर ह्यांनी कोसला वर अभिप्राय देताना मोठे मर्मज्ञ विवेचन केले आहे. ते खाली वाचा : "लेखकाचे माप ह्याप्रमाणे त्याच्या पदरात घातल्यावर ( म्हणजे having given the devil his due असं मला म्हणायचं होतं ) आपल्याला एक भयानक शंका ग्रासू लागते. पांडुरंग सांगवीकर अखेर निमित्तमात्र. ज्या मृतांचे धर्म निरूपावयाचे आहेत ते शंभरातले नव्व्याण्णव नव्हे. तर स्वत:ला मृत ठरवणारे एक--जीवनमृत. कादंबरीच्या मीच्या आतला मी--गिरधर. ज्याला "स्वदेशबंधु त्याज्य : स्वग्रामबंधु त्याज्य ; संबंधित : यांचा संबंधु : तो विशेषत: त्याज्य, " ज्याला घरी राहणे दिवसेंदिवस जड होते, काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म. अनुभवाचे विघटन, त्याचे "वगैरे"करण ही नुसती सुरुवात, जमीनीची नांगरट. त्यात पेरणी करायची, ती आपण एकटे आहोत, काम्युने चितारलेला outsider आहोत, ए.ई.हाउसमनने व्यक्तविलेल्या " a stranger and afraid, In a world I never made" ह्या जाणिवेची. आधुनिक मानवाच्या विचार-कल्पनाविश्वातली ही एक महत्वाची जाणीव. हिची जातकुळी एकीकडे शेक्स्‌पियरच्या हॅम्लेटपर्यंत पोचते; दुसरीकडे बौद्ध, जैन, ह्यांच्यापर्यंत. आधुनिक मराठी साहित्यापुरते म्हणायचे तर मर्ढेकरांचे नाव सुचते . पण मर्ढेकरसुद्धा एक आनंदी, आशावादी प्राणी होता असे तुलनेने वाटावे इतके हे दुखणे विकोपाला गेले आहे. माणसाला संवेदनक्षमता जरूर असावी. पण तो अवघा संवेदनाच होऊन गेला, "सम्‌" जाऊन वेदनाच शिल्लक राहिली, तर ज्या विश्वाची चिंता करायची त्या विश्वाशीच संबंध तुटतो---"जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे". आता ह्या केळकरांच्या अभिप्रायाचा काय अर्थ निघतो ? एक तर सॅलिंजरची कादंबरी निवेदन शैलीने जास्त यशस्वी आहे व "कोसला" नाही . कारण नेमाडेंना काय सांगायचे आहे तेच डेंजरस ह्या अर्थी गंभीर आहे. आणि दुसर्या् परिच्छेदात ते कसे चूक आहे ते दाखविले आहे. एकटेपणाची जाणीव जरी वैश्विक असली तरी "काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म" ही विचारसरणीच कशी चूक आहे ते केळकर एका उदाहरणाने सांगत आहेत. एखाद्या पक्षाने घरटे ( कोसला ) बांधावे पण स्वत: मरून जावे तशीच ही नेमाडे सांगताहेत ती जाणीव आहे. ह्यापेक्षा तिखट अजून कोण लिहिणार आहे नेमाडेंच्या "कोसला"-पद्धतीच्या विचारांवर ?

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

नि. नू. ने. ( नित्य नूतन नेमाडे ! )
घुमान साहित्य संमेलनाला गेलेल्या लोकांना ज्ञानपीठा पेक्षा जिलेबी ज्यास्त आवडते. “ज्यांना नव्याने काही लिहावयाचे नाही, अशी मंडळी संमेलनास उपस्थित राहात असल्याचा आरोप नेमाड्यांनी केला. नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे रविवारी झालेल्या जीवन-गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.”
खरेच मराठी सारस्वत, कागद आणि त्यात गुंडाळलेला गूळ एकाच चवीने खाणाऱ्या गाढवाप्रमाणे स्थितप्रद्न्य झालेला असावा . ( पहा : तुझे आहे तुजपाशी ले: पु.ल.देशपांडे ). नसता ते साहित्य संमेलनात ज्ञानपीठ आणि जिलेबी एकाच चवीने का मोजते बरे ? ( पहा : रा.रा . नेमाडे ह्यांचे आरोप ). मराठी सारस्वत गाढव तर नक्कीच असावे नसता त्याने “ज्ञानपीठ” असे भलत्याच माणसाला दिले नसते.
“ज्यांना नव्याने काही लिहायचे नाही अशी मंडळी” असा मार्मिक निकष लावीत रा.रा. नेमाडे ह्यांनी सह-साहित्यिकांना दूषणे दिलीत हे मात्र नेहमीप्रमाणे आहे, नव्याने काही नाही, असे मात्र वाटून घेवू नये. कारण नेमाडे नित्य नेमाने शिव्या देतात असे जरी वरकरणी वाटत असले तरी ते दरवेळी नव्या मंडळींना शिव्या देतात हे नोंद करण्यासारखे आहे. ते केवळ ब्राह्मण साहित्यिकांनाच  शिव्या देतात असे नाही तर त्यात दरवेळी नवीन नवीन ब्राह्मण साहित्यिकांना शिव्या देतात, त्यामुळे दस्तुरखुद्द नेमाडे हे स्वतः नित्य नूतन लिहिणारे लेखक आहेत हे सिद्ध होतेच !
काहींना वाटते की नेमाडेंचा नायक हा नेहमी न-नायक स्वरूपाचा, रुढ रीतीविरुद्ध वागणारा, डीप्रेशनचे अप्रूप असणारा, समाजाला तुच्छ लेखणारा, हरलेला नायक असतो. पण नि.नू.ने. हे दरवेळी त्याचे वेगळे नाव ठेवतात हे किती वाखाणण्याजोगे आहे ! नेमाडेंना उगाच नाही दररोज नित्य नूतन पुरस्कार मिळत आहेत.
इतके असूनही घुमान साहित्य संमेलनाला ज्ञानपीठा ऐवजी जिलेबी ज्यास्त गोड लागावी ? का ह्या आरोपा आडून नेमाडे आमंत्रण मागत आहेत ? एक शेवटचे संमेलन घेवूनच टाका कसे ! ( नेमाडे म्हणे फक्त ( का नेमाडे शैलीत फकत ?) शेवटच्या संमेलनाला येईन असा त्यांचा पण असल्याने ).
---------------------------------------------   


http://epaper.loksatta.com/c/4921098





 http://epaper.loksatta.com/c/4921098

मंगळवार, १० मार्च, २०१५


लिहिता लेखक
पूर्वी ज्ञानपीठ हे लेखकाच्या कलाकृतीला देत. आजकाल ते लेखकाच्या लेखनाला दिले जाते. असे होऊ नये की कधी काळी ( फारा वर्षापूर्वी ) लेखकाने लिहिले व त्याला आज पुरस्कार दिला. म्हणून अजून एक अट अशी की निदान गेल्या २० वर्षात लेखक लिहिता असलेला असावा. ह्या अटीमुळे, नेमाडे ज्यांना आडदांड म्हातारे कुत्रे म्हणतात ( जसे बिढार मध्ये कुसुमाग्रज ) अशा कधीकाळी लिहून गेलेल्या म्हाताऱ्यानाच पुरस्कार जाणार नाही अशी तजवीज होते.  
आता ह्या अटीवर नेमाडे कसे उतरतात ? नेमाडेना पुरस्कार दिला गेला २०१४ सालचा. त्या आधी २० वर्षे, म्हणजे निदान १९९४ पासून हा लेखक लिहिता असला पाहिजे, अशी ही अट होते. आणि ह्या अटीमुळे तरुण लिहित्या लेखकांना पुरस्कार मिळावा ( जी अपेक्षा नेमाडेंचीही त्यांच्या तरुणपणी होती ) अशी व्यवस्था तयार होते.
नेमाडे ह्यांची एकूण साहित्य संपदा पहिली तर १९६३ साली पहिली कादंबरी कोसला, त्यानंतर १९७५च्या आधी बिढार, हूल, जरीला, व झूल ह्या कादंबऱ्या. टीका-स्वयंवर हे १९९० साली व काव्य-संग्रह देखणी व मेलडी हेही १९७५च्या आधीचे. म्हणजे ज्ञानपिठाच्या कट-ऑफ वर्षापासून ( १९९४ पासून ) नेमाडे ह्यांनी केवळ “हिंदू” ही कादंबरी लिहिलेली दिसेल. त्यांचे बाकीचे लेखन हे त्या आधी किती तरी वर्षे अगोदर लिहिलेले. हिंदू कादंबरी त्यांना लिहायला लागली ३५ वर्षे. हे काय सृजन म्हणायचे ? तेव्हढ्यावर का ह्याना “लिहिता लेखक” म्हणायचे ? खरे तर केवळ ह्याच मुद्द्यावर नेमाडे ह्यांनी हा पुरस्कार दुसऱ्या कोणा तरुण, लिहित्या लेखकाला द्या असे म्हणावे !
-------------------------------------


रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

आंधळे  दळताहेत व कुत्रे पीठ खाताहेत ....
साहित्याचा व्यवहार मोठा अजब पद्धतीने चालतो ! इथे कशाला चांगले साहित्य म्हणावे ह्याचे काही नक्की निकषच नसतात. जे पुस्तक खूप खपले त्याला चांगले म्हणावे तर समीक्षक म्हणतात खपण्याचा व चांगले असण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो ! किंवा जे लोकप्रिय ते कमअस्सल असाच साहित्यिक हेका असतो. एखाद्या लेखकाने सगळे साहित्य प्रकार हाताळलेले असतील तर तो मोठा का ? तर असे काही नाही . एकाच अभंग ह्या वृत्तात कवने लिहिणारे संत तुकाराम ह्याना कमी कसे लेखायचे ?
आपण जसे सोनाराच्या दुकानात गेल्यावर त्यालाच विचारतो की हे सोने २३ कॅरट की २४ कॅरट ? असेच मग लोक साहित्यातल्या जाणकारांना ( पक्षी प्राध्यापक, प्रकाशक, समीक्षक, विध्यार्थी वगैरे ) विचारतात की कसे आहेत हो हे नेमाडे लेखक ? त्यावेळी जर असा दबदबा असेल की त्यांनी म्हणावे आहेत बुवा ! व मग आपण ते मानावे ! असाच असतो का साहित्य-व्यवहार ?
नुकतेच ज्ञानपीठ मिळालेल्या श्री. रा. रा. भालचंद्र नेमाडे ह्यांनी ह्यावर एक छान मार्गदर्शन केले आहे. ज्याना ज्ञानपीठ किंवा नोबेल पारितोषिक मिळालेले आहे अशा साहित्यिकांना तरी आपण मोठे मानायचे का ? तर नेमाडे म्हणतात, छे, पारितोषिके कशी दिली जातात हे का आपल्याला माहीत नाही ? त्यावरून कसे कोणाला मोठे समजायचे ? उलट अशा पुरस्कार-प्राप्त लोकांची अशी टर उडवायची की कोणी मोठे उरलेच न पाहिजे . (..... मग मीच मोठा ठरणार नाही का ?). त्यात मग दया माया नाही. ज्यांच्या नावाने पुरस्कार देताहेत त्यांची तर ज्यास्तच खिल्ली उडवायची ..उदाहरणार्थ : कुसुमाग्रज . ( ह्यानाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता व त्यांच्या नावाचा पुरस्कार नुकताच नेमाडेंना देण्यात आला होता. ).

कुसुमाग्रजांबद्दल ते बिढार मध्ये काय म्हणतात ते पहा व ठरवा की कुसुमाग्रज कोण आहेत व नेमाडे कोण आहेत ?
बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
 " स्वातंत्र्य मिळायच्या आधी साले तरुण होते तेव्हा यांना संधी नव्हती. नुस्ते कातावले होते. सत्तेचाळीसनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर साल्या सरकारनी धडाधड उत्तेजनपर प्रकार सुरू केले. तेव्हा ही म्हातारी मंडळी त्यावेळची राहिलेली खाज भागवायला तुटून पडली. आज इतकी वर्ष झाली तरी ह्या निब्बर लोकांची चढायची हौस कमी होत नाही. तुम्हा नवीन पोरांचं कौतुक कोण करणार ह्या गर्दीत ? "

म्हणजे काय की जे साहित्याचे दळण दळीत आहेत ते आंधळे आहेत असे ठरवायचे किंवा त्याना आपल्या वाग्बाणाने आंधळे करायचे . मग जी कुत्री आजूबाजूला माजावर येउन घुटमळत आहेत त्यांनी यथेच्छ पीठ खायचे ! मग ते ज्ञानपीठ असो वा नोबेल !
( फक्त आज नेमाडे किती वर्षाचे आहेत ते विचारू नका, माजावर आहेत ना ? खाउ द्या ज्ञानपीठ !  )

----------------------------------------------------

गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

जातीवंत विचारवंत !
साहित्य संमेलनात “ब्राह्मणी” विचार आजही प्रभाव टाकतात अशा अर्थाचे नेमाडे ह्यांचे एक वक्तव्य नुकतेच आले आहे. विचारांची एक प्राथमिक नड अशी असते की त्याला काही ताळ-तंत्र असावे लागते. कथा कादंबऱ्यात तसे नसले तरी ते चालते . पण त्याबाहेर जर तुम्ही काही विचार मांडीत असाल तर त्याला कुठल्या तरी शास्त्रीय, तार्किक विचारांचा पाया लागतो. जर नेमाडे ह्यांनी साहित्य संमेलनात येणारे एकूण लोक, व त्यातले ब्राह्मणांचे प्रमाण असे काही आकडे दिले असते तर तो एक तर्क म्हणता आला असता. पण मोघम ठोकून द्यायचे हे कादंबरीचे मुभा-तत्व वापरत त्यानी जातीवाचक निष्कर्ष द्यावेत हे त्यांच्या “जातीवंत-विचारवंत ” असल्याचेच द्योतक आहे !
शिक्षण कुठल्या भाषेत हवे हे सांगण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे हे तर निर्विवादच आहे व त्या सोयीने नेमाडे हवे ते सांगू शकतात. पण त्याला विचारवंत पणाचा धाक आणायचा असेल तर काही शास्त्रीय विचारांचा टेकू हवा. नेमाडे जरी सुशिक्षित असले तरी हा शिक्षणशास्त्राचा, समाजशास्त्राचा, भाषाशास्त्राचा  विषय होतो. त्या प्रांतातील काही प्रमेये घेवून आपली मते दिली तरच  ती मार्गदर्शक म्हणून कोणी स्वीकारील. अन्यथा त्याला शिळोप्याच्या गोष्टीचेच स्वरूप येते. हे नेमाडे कधीच करीत नाहीत. कदाचित कथा कादंबऱ्यात कपोल कल्पित लिहिण्याच्या सवयीमुळे ते असे बरळ, विचार म्हणून रेटीत असावेत .

-----------------------------------  

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

----------------------------
नेमाडेंचे ते बाब्ये, आमचे ते कार्टे ?
------------------
देशीवाद ह्या सदराखाली नेमाडेंनी युनिक फीचर्सच्या मराठी ई-संमेलनात खालील वक्तव्य व लिखाण केले आहे :
"नवीन पिढीला हे जास्त चांगलं कळतं. ही पिढी मोठ्या प्रमाणावर जागतिकीकरणाला सामोरी जातेय. ती आपोआप शिकत असते. उदाहरणार्थ, माझे दोन्ही मुलगे इंजिनियर आहेत. एक मेटरॉलॉजीमधे तर दुसरा इंस्ट्रुमेन्टल सायन्समधे. त्यातला एक लहानपणी कविता करायचा. अशा मुलाने चौथी-पाचवीत मराठीत कविता करणं आणि पुढे इन्स्ट्रुमेन्टल इंजिनियर होऊन नंतर आयआयटीत प्राध्यापक होणं हा बदल जागतिकीकरणामुळे झालेला आहे. नाही तर आधी असा मुलगा मराठीत बी.ए. होऊन कुठेतरी पसायदान वगैरे शिकवत बसला असता. पण ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे किती दिवस म्हणत बसणार? त्यापेक्षा तिमिरातच काही तरी केलेलं बरं, असं ही नवीन मुलं ठरवतात. नवीन मुलांना आपल्यापेक्षा जास्त जाणीव असते, त्यामुळे काय सोडायला हवं ते ते सोडतात आणि नवीन मार्ग शोधतात."

आपल्याकडे "आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट !" असा वाक्‌प्रचार आहे. त्याप्रमाणे परंपरा मोडणारी ही नेमाडेंची मुले म्हणजे बाब्या व एक्स्प्रेसवे वर शिंग्रोबाचे देऊळ न बांधता थांबण्याची सोय न करणारे जागतिकीकरण करणारी मुले ही कार्टी असेच होते ना ?

नेमाडेंच्या नुसत्या पुरस्कारांच्या संख्येवरून त्यांना वैयक्तिक बाबींचाही अभिमानाने उल्लेख करायचा नक्कीच अधिकार आहे, तो त्यांनी केला हे चांगलेच आहे. पण त्यांची स्वत:ची प्राध्यापकाची परंपरा त्यांनी मोडली हे जसे त्यांना अभिमानाचे वाटते तसेच जुना हायवे सोडून नवीन एक्स्प्रेसवे केला हे का अभिमानाचे वाटू नये. त्यावर नसलेल्या शिंग्रोबाच्या देवळाचे वा थांबा नसल्याचे ( थांबा नाही हा त्यांचा गोड गैरसमज आहे हे कोणीही मधल्या फुडमॉल मध्ये काही गोड खावून अनुभवू शकेल ) त्यांना का सलावे व आपल्या मुलांनीच परंपरा तोडली ह्याचे एवढे कौतुक का वाटावे ?
नेमाडेंची मुले म्हणजे बाब्या व आम्ही सारे कार्टे काय ?
-----------------------------------------------------
------------------------
नेमाडे असे का ? कुसुमाग्रज असे का ?
-------------------
जनस्थान पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणात नेमाडे ह्यांनी त्यांना चंद्रशेखर व कुसुमाग्रज आवडत असे सांगत त्यांचे कुसुमाग्रजांशी कसे चांगले संबंध होते ते सांगतांना असे म्हटले की तात्यासाहेब ( म्हणजे कुसुमाग्रज ) त्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांच्या शैलीप्रमाणे नेमाडे असे का ? असे प्रश्नार्थक विचारीत. त्यांच्या एका पत्रात असे दहाबारा प्रश्नचिन्हे तरी असत. आता ह्या माहीतीमुळे सांप्रतच्या वाचकांच्या मनात एकच प्रश्न येतो, तो असा की येवढे चांगले संबंध व आदर नेमाडेंसंबंधी होता तर कुसुमाग्रजांनी निवडलेल्या १०० कवितात नेमाडेंची एकही कविता का नाही ? का कुसुमाग्रज, असे का ?
मराठीतील पन्नास कवींच्या ह्या १०० कविता कुसुमाग्रजांनी निवडून त्याचे पुस्तक अनुभव प्रकाशन तर्फे १९९१ मध्ये छापलेले आहे. त्यात नेमाडेंचे समकालीन विठ्ठल वाघ, ना.धों.महानोर, ग्रेस ( माणिक गोडघाटे), केशब मेश्राम, दया पवार, सुरेश भट, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर ह्यांची आवर्जून नोंड घेतलेली आहे. फक्त नेमाडे नाहीत. त्याआधी नेमाडेंचे कोसला, बिढार( १९७५), देखणी ( कवितासंग्रह), झूल, हूल, जरीला वगैरे साहित्य प्रसिद्ध झालेलेच होते. टीकास्वयंवरही १९९९० मध्ये प्रकाशित झाले. बिढार मध्ये कुसुमाग्रजांविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत नेमाडेंनी जे लिहिले आहे, ते एकवेळ, ते परंपरा मोडणारे असल्याने क्षम्यही असेल. पण कुसुमाग्रजांनी ज्या नेमाडेंना ( आता ) पुरस्कारही दिला त्यांनी ते हयात असताना व नेमाडेही हयात असताना त्यांच्या कविता ह्या १०० कवितात का बरे घेतल्या नाहीत ? मराठी सारस्वताचे अशाने नुकसान नाही का होत ? ज्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिवस  साजरा करतो व नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे जे त्यांच्याशी संपर्कात असत, त्यांनीच असा भेदभाव का करावा ?  शिवाय त्यांनी बिढार मध्ये जे नेमाडेंनी लिहिले त्याकडे का बरे दुर्लक्ष केले ?
म्हणजे आता मराठी वाचकाने समजायचे तरी काय ? नेमाडे असे का ? का कुसुमाग्रज असे का ? किती हे प्रश्न ! ( हे लिहिताना नेमाडे व कुसुमाग्रज ह्या दोघांबद्दलही आदर राखूनच लिहिलेले आहे हे समीक्षकांनी ध्यानात घ्यावे.).
--------------------------------------------------------
---------------------------------------------------
रंगनाथ पठारेंनी तरी समजवावे ह्यांना....
----------------------------------------
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी समीती नेमण्यात आलेली आहे ती प्रा.रंगनाथ पाठारे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे व त्यांचा अहवाल अजून सरकारला मिळायचा आहे. त्यानंतर एका वर्षात कदाचित हा दर्जा मराठीला मिळू शकतो. मागच्या वर्षी मळ्याळम भाषेला हा दर्जा नाकारण्यात आला होता व ह्या वर्षी त्यांना तो देण्यात आला. ही व इतर माहीती खाली दिलेल्या लेखात अवश्य वाचा.
तसेच प्रा.रंगनाथ पठारे ( हे फेसबुकवर आहेत ) ह्यांना कळवा की जर कोणी ह्या प्रयत्नात खीळ घालत असतील किंवा मराठी ही प्राचीन भाषा नाही असे म्हणत असतील तर त्यांनी त्यांना बिनदिक्कत छान समजवावे....
उदाहरणार्थ :  आपली येऊ घातलेली कादंबरी खपावी म्हणून नुकतेच नेमाडे ह्यांनी असे विधान केले आहे की पुणेरी मराठी ही भाषाच नसून ती प्राचीन तर नाहीच. त्यांच्या मते ते बोलत असलेली खानदेशी भाषा हीच प्राचीन आहे. आजकाल खपाच्या दृष्टीने अशी काही खळबळ किती कामाची असते ते मला नुकतेच ध्यानात आले. आमच्या लायन्स क्लबचा एक सभासद मला परवा विचारीत होता की ए नेमाडे कौन है ? मी त्याला का? असे विचारल्यावर तो म्हणाला की माझ्या फेसबुक भिंतीवर त्याने माझे काही वाचले व म्हणून तो विचारीत होता की ये नेमाडे कौन है, जिससे तुम्हारा पंगा चालू है ? .....पहा , कशीही मिळणारी प्रसिद्धी कशी कामाची असते...

-----------------------------------------------------
नेमाडेंचा बलात्कार :
नेमाडे हे जितके गंभीर लेखक आहेत असे उमरीकरांना वाटते त्यापेक्षा किती तरी ज्यास्त गंभीर कुसुमाग्रज आहेत. त्यांच्या नावाने आपण मराठी-दिन साजरा करतो तेव्हा निदान काही पथ्ये तरी त्यांनी पाळायला हवी. अशा वेळी त्यांनी बिढार मध्ये कुसुमाग्रजांना आडदांड कुत्रा का म्हटले त्याचे एक तर स्पष्टीकरण द्यायला हवे होते अथवा दिलगीरी. निदान अशा पुरस्कारावेळी आपण जे बोलतो ते कोणा जाणकारांना विचारून ( ते इंटरनेट निरक्षर असल्याने विकीपीडीयात तरी पडताळून बोलायला पाहिजे होते असे म्हटले नाही.), जे बोलतो आहोत ते हंशा मिळवणारे असल्यापेक्षा तर्काचे असणे त्यांनी महत्वाचे मानायला हवे होते. उदाहरणार्थ : आजकाल बलात्कार का होत आहेत. खरे तर हा समाजशास्त्रात संशोधनाचा विषय असताना त्याची आपल्या देशीवादाच्या बळावर कशीही बोळवण करणे हे खचितच विचारवंताचे लक्षण नाही. नेमाडे त्या पुरस्कारात म्हणते झाले की बायकांची संख्या कमी असल्याने हे पुरुषांच्या नॅचरल इन्स्टिक्ट मुळे बलात्कार होत आहेत. त्यांनी जुजबी वाचन केले असते तरी त्यांना कळले असते की जेंडर रेशोचे जे आकडे असतात ( जसे दर १००० पुरुषांमागे ८७५ स्त्रिया ) ते जन्माच्या वेळेसचे असतात. पुरुषांचे मरणे ( Mortality) हे त्यांच्या हयातीत बायकांच्या मरण्यापेक्षा ज्यास्त असते. शिवाय लढाया व पुरुषांच्या इतर हिंसक वागण्याने ते बायकांपेक्षा ज्यास्त मरतात. बरे जन्मलेल्या बालकातले ज्यास्तीचे पुरुष बलात्कार करूच शकत नसतात. त्यांना जरा तरी मोठे व्हावे लागते. त्यासाठीच तर जेंडर रेशो मध्ये १५-६५ अशा वयोगटासाठी वेगळा रेशो देतात. अमेरिकेत तर ह्या वयोगटासाठी दर हजार स्त्रियांमागे केवळ ७२० पुरुष अशी परिस्थिती आहे. भारतासाठी ह्याच वयोगटासाठी हा आकडा आहे : दर हजार स्त्रियांमागे १०७० पुरुष ( हे समसमान होते). ६५ वर्षांवरच्या वयोगटासाठी हाच आकडा दर हजार स्त्रियांमागे ९०० पुरुष असा होतो. आता तुम्हाला विकीपीडीया किंवा इतर दस्त-ऐवज वाचायचा नसेल तर निदान आपल्या घरात ह्या वयोगटातली माणसे मोजलीत तरी कळेल की वरील कारणांमुळे आणि स्त्रियांचे सरासरी आयुमान पुरुषांपेक्षा ज्यास्त असल्याने त्यांचीच संख्या कुटुंबात ज्यास्त असते.
आता हे इतके सरळ साध्या तर्काचे असल्याने कुठलेही वाचन न करता इतक्या प्रगल्भ लेखकाने असे दडपून सांगावे हा मराठी सारस्वताच नव्हे तर कुसुमाग्रजांनाही गृहीत धरण्याचा प्रकार आहे. हे खचितच भूषणाचे नाही. तशात आम्ही हे त्यांच्या नजरेस आणूही शकत नाही. कारण ते इतरांचे वाचत नाहीत हे तर दिसतेच शिवाय त्यांचे भाट ही त्यांना हे सांगत नसावेत. मग नेमाडेंच्या चुका सुधारायच्या तरी कशा ?

बुधवार, २९ जानेवारी, २०१४

कोण मग्रूर नेमाडे का देशमुख ?

भालचंद्र नेमाड्यांची सुवर्णमहोत्सवी ‘मगरूरी’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 28 जानेवारी 2014 


भालचंद्र नेमाडे हे मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार. त्यांच्या गाजलेल्या आणि गाजवलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला 50 वर्षे पुर्ण झाली म्हणून एक विशेष आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली. त्या निमित्ताने लिहीताना नेमाडे यांनी या कादंबरीच्या पहिल्या प्रकाशकाचा रा.ज.देशमुख यांचा उल्लेख ‘मगरूर’ प्रकाशक असा केला. सध्याचे देशमुख आणि कंपनी चे संचालक रवींद्र गोडबोले आणि संपादक सल्लागार विनय हर्डीकर यांना ही बाब खटकली. नेमाडेंच्या विधानाचा खरपुस समाचार घेत त्यांनी नेमाडेंचा देशमुखांशी असलेला पत्रव्यवहारच वाचकांसाठी खुला केला.
इतरांच्या टोप्या उडविणारे नेमाडे, आधीच्या पिढीच्या लेखक समीक्षकांना झोडपून काढणारे नेमाडे, आपली वादग्रस्त मते तलवारीसारखी सपासप चालवून समोरच्याला घायाळ करणारे नेमाडे हे विसरून गेले की आपलीही टोपी कोणी उडवू शकतो. साहित्यातील अड्ड्यांबद्दल नेमाडे यांचा आक्षेप असा होता, ‘अड्ड्यांची पहिली शपथ म्हणजे मिळून एकमेकांना ‘वर’ चढवणे किंवा मिळून एखाद्याच्या उथळपणाबद्दल मौन पाळणे.... एकमेकांच्या मोठेपणाचा प्रचार करणे, मानमान्यता मिळवून देणे इ. होत.’ आता हा लेख नेमाडे यांनी 1968 मध्ये लिहीला आहे. तोपर्यंत नेमाडे यांची कोसला प्रकाशित झाली होती.  आणि याच वेळी नेमाडे देशमुखांना पत्रात लिहीतात, ‘दावतरांना पत्र टाकले आहे. प्रत पाठवावी (कोसलाची). मीहि आता गेल्यावर ओलोचनेकरिता बी कवींच्या चांफ्यावर लिहून पाहिजे ना? मग कोसल्यावर लगेच छापा असं सांगतोच.’
म्हणजे नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर परिक्षण वसंत दावतर ‘आलोचने’मध्ये छापणार असतील तर नेमाडे त्यांना बी. कवींच्या कवितेवर लेख लिहून देणार आहेत. आपल्या पुस्तकावर इतरांनी लिहावे या वृत्तीचा नेमाडेंनी नेहमीच उपहास केला आहे. असे नेमाडे रा.श्री. जोग यांच्या सारख्या ज्येष्ठ समीक्षकाबद्दल रा.ज.देशमुख यांना पत्रात लिहीतात, ‘जोगांना लिहिलेय तूम्हाला लवकरच प्रत मिळेल. आमची इच्छा आहे परंतु तुमचीहि असल्यास कुठेतरी कोसल्यावर लिहा.’ आता इतरांवर टिका करणारे नेमाडे रा.श्री.जोग यांना आपल्या कादंबरीवर लिहावे अशी गळ का घालत आहेत? आजचा एखादा नवा लेखक आपल्या पुस्तकाची प्रत मोठ्या लेखक समीक्षकांना आशेने पाठवतो आणि त्यांनी त्यावर लिहावे अशी अपेक्षा धरतो. यात आणि नेमाड्यांत काय फरक आहे?
 आर्थिक व्यवहारांत नेमाडे असे सर्वत्र पसरवत राहिले की देशमुखांनी त्यांना गंडवले. खरी परिस्थिती अशी आहे की 1963 ला पुस्तक प्रकाशित केल्यापासुन 1970 पर्यंत त्याचे कित्येक छापील फॉर्म्स बांधणी न करता देशमुखांच्या गोदामात तसेच पडून होते. शिल्लक सर्व प्रती, सुटे फॉर्म्स हे सर्व नेमाड्यांनी खरेदी केले. विक्री झालेल्या प्रतींचा रॉयल्टीचा हिशोब केला. मधल्या काळात नेमाड्यांना देशमुखांनी उसने पैसेही दिले होते. तसे सविस्तर पत्रच आहे.  हा सगळा हिशोब मिटवून 870 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट नेमाड्यांनी देशमुखांना दिला. पुस्तकाच्या प्रती व छापील फॉर्म्स ताब्यात घेतले.
नेमाड्यांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी होती आणि देशमुखांनी त्याचा फायदा करून घेतला असे काही वातावरण नव्हते. नेमाड्यांची कादंबरी सात वर्षे पडून होती. इतकेच नाही तर खुद्द नेमाडे यांनाही मराठी प्रकाशन व्यवसायाबद्दल कल्पना असावी. कारण ‘दुसर्‍या बाजीरावावर एक नाटक पुढच्या वर्षी मूड आल्यास लिहायचा विचार आहे. ते वाचून पाहून खपण्यासारखे असल्यास तुम्ही प्रकाशित करालच. परंतु खपण्यासारखे नसल्यास प्रकाशित कराल काय हे कळवा. नुसते बाड घेऊन प्रकाशकांची दारे हिंडणे बरे नव्हे. म्हणून लिहिण्याआधी प्रकाशक गाठावा हे बरे.’ जर काही शंका असतील तर नेमाडे यांनी दुसरा प्रकाशक गाठावा असे देशमुखांनी स्पष्टपणे लिहीले आहे. त्यावरही परत नेमाडे अहमदनगर येथून 1964 साली आपल्या पत्रात लिहीतात, ‘मी दुसर्‍या कोण्या प्रकाशकासाठी लिहावे असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तो बरोबर नाही. आम्ही इतर प्रकाशकांशी गेल्या वर्षभर किती फटकून वागलो याच्या गोष्टी तुमच्या कानी आल्या असतील.’
नेमाड्यांना दोन पत्रे देशमुखांनी लिहीली. त्यातील एका जास्त सविस्तर आहे. त्याला कारणही तसेच घडले. नेमाड्यांनी देशमुखांकडून उसने पैसे घेतले होते. त्यासाठी स्टँपवर सही द्यावी असा आग्रह देशमुखांनी केल्यावर नेमाडे यांना राग आला. नेमाडे 1965 मध्ये म्हणजे कादंबरी प्रकाशित झाल्यावर दोन वर्षांनी तक्रार करतात, ‘कॉन्ट्रॅक्ट न करता लेखकाजवळून कादंबरी घेणे व स्नेही म्हणून पैसे देऊन स्टॅपवर सही घेऊन अन्नदात्याबद्दल अविश्वास दाखवणे, ह्याचा अर्थ काय?’
आता मात्र देशमुखांमधला ‘देशमुख’ जागा झाला. लेखकांच्या पुस्तकांवर प्रकाशक जगतो. लेखक त्याचे अन्नदाते आहेत हे खरे आहे. पण नेमाड्यांसारखा नवा लेखक आणि ज्याच्या पुस्तकाचा खप अजून फारसा सुरू झाला नाही तो देशमुखांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की लगेच वेगळ्या भाषेत बोलायला लागतो हे देशमुखांना खटकणारच. कुणालाही ते खटकेल.
रा.ज.देशमुखांकडे वि.स.खांडेकर, रणजित देसाई, पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, चि.वि.जोशी, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे ‘खपाऊ’ लेखक होते. शिवाय पाठ्यपुस्तकांचा मोठा व्यवसाय त्यांच्या हाताशी होता. यांपैकी कुणी असा शब्द वापरला तर देशमुखांनी एैकून घेतला असता. यांच्यापुढे आर्थिक दृष्ट्या नेमाड्यांच्या कादंबरीचा काय पाड? आजही इतक्या वर्षांनी ‘कोसला’ च्या किती आवृत्त्या निघाल्या आहेत? तर पन्नास वर्षांत जेमतेम 25 आवृत्त्या. एक आवृत्ती हजार किंवा दोन हजारांची. नेमाड्यांच्या पुस्तकांची वाङ्मयीन गुणवत्ता इथे अभिप्रेत नाही. नेमाड्यांनीच मुद्दा ‘अन्नदाता’ असा शब्द वापरून आर्थिक दिशेने नेला आहे.
यानंतर म्हणजे 1965 ते 1970 देशमुख आणि नेमाडे हे संबंध ताणाताणीचे राहिले. आणि शेवटी हा व्यवहार नेमाड्यांनी 1970 मध्ये पूर्ण केला. पुस्तकांची दुसरी आवृत्ती स्वत: काढायला नेमाडे तयार झाल्यावर अगदी पंधरा दिवसांत देशमुखांनी हा व्यवहार संपवला. या आवृत्तीत नेमाडे पुरते आत आले हा भाग परत वेगळाच.
ह्याच नेमाड्यांनी दुसरी कादंबरी ‘बिढार’ लिहीली. त्यात देशमुख पती पत्नींचे व्यक्तीचित्र ‘कुलकर्णी प्रकाशक पती पत्नी’ असं विरूप करून रंगवले आहे. नविन पुस्तकाचे कौतुक करण्यासाठी देशमुख पती पत्नी गाडी करून औरंगाबादला आले. नेमाडे पती पत्नीला कपड्यांचा आहेर शिवाय मुलांसाठी खेळणी, फळांच्या करंड्या असा सगळा जामानिमा घेऊनच देशमुख आले होते. त्यांनी नेमाड्यांना (इतकं सगळं होवूनही) नविन कादंबरी छापण्यासाठी मागितली.  नेमाड्यांनी ती दिली नाही. नागपुरच्या अमेय प्रकाशनाला ती दिली. ते प्रकाशनही गुंडाळल्या गेले. मग नंतरची नेमाड्यांची सगळी पुस्तके भटकळांच्या पॉप्युलरकडे मुंबईला आली. कदाचित भटकळांना नेमाडे ‘मी तूमचा अन्नदाता’ असे म्हणू शकतात.
दुसर्‍यांच्या टोप्या उडवणार्‍या नेमाड्यांनी देशमुखांच्या बाबतीत संकुचितपणा दाखवत आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविले. सरस्वती भुवन संस्थेत नौकरी लावून द्या म्हणून देशमुखांकडे आग्रह धरणे, नंतर त्याच संस्थेवर टिका करणारी कादंबरी लिहीणे, आपल्याला लेखक म्हणून उभं करणार्‍या देशमुख पती पत्नीचे कादंबरीत व्यंगचित्र रेखाटणे या सगळ्याला काय म्हणावे? आता हर्डीकर/गोडबोले यांनी हा पत्रव्यवहाराद्वारे नेमाडेंची सुवर्णमहोत्सवी मगरूरी उघड केली आहे.
इतरांना शहाणपण शिकविणारे नेमाडे सगळे नियम वाकवून दुसर्‍यांदा साहित्य अकादमीचे अध्यक्षपद पटकावतात, व्यवस्थेला शिव्या देत साहित्य अकादमी पारितोषिक स्विकारतात, पद्मश्री स्वीकारतात. पद्मश्रीसाठी शिफारस महाराष्ट्रातून नाही तर हिमाचल प्रदेशातून झालेली असते आणि हे सगळं होताना नेमाड्यांच्याच जळगांवच्या जून्या स्नेही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून दिल्लीत बसलेल्या असतात. सिमल्याचे राष्ट्रपती भवन नेमाड्यांना मुक्तहस्ते वापरायला भेटते. हे सगळं म्हणजेच समृद्ध अडगळ असं सुजाण वाचकांनी समजून घ्यावे.  (ज्यांना नेमाडे-देशमुख पत्रव्यवहार वाचण्याची उत्सुकता आहे त्यांनी विनय हर्डीकरvinay.freedom@gmail.com व रवींद्र गोडबोले ravindragodbole@aquariustech.ne या मेलवर संपर्क करावा)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575


गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

-----------------------
गर्वसे कहो हम "मग्रूर" है !
-----------------------------------
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक "रसिक" नावाने एक स्फुट आले आहे. त्यात म्हटले आहे की भालचंद्र नेमाडे ह्यांनी "कोसला"च्या २२ व्या आवृत्तीसाठी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात कोसलाचे प्रथम प्रकाशक रा.ज.देशमुख ह्यांना धुरंधर व मग्रूर म्हटले आहे. त्यावर तिथले आजचे हर्डीकर वगैरे त्यासंबंधीचा पत्रव्यवहार खुला करू इच्छित आहेत.
एवढे कष्ट कशाला घ्यायचे ? नेमाडेंना ज्यांचा कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला त्या कुसुमाग्रजांबद्दल ते बिढार मध्ये काय म्हणतात ते पहा व ठरवा की "मग्रूर" कोण आहे ?
बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे."
--------------------------------

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

नेमडी

सहजासहजी देशीपणाचे डाग लेखनावर पाडून घेतले
महानुभाव मासिकापासून ग्रामीण साहित्यापर्यंत
प्रत्येकाचे स्वतंत्र राष्ट्रगीत नि राष्ट्रध्वज झाला
तेव्हा मोघम चिखलफेक करीत कपडे झटकले

वासरांच्या कळपात लंगडी गाय होण्यासाठी
कैक वर्षे वेशभूषा केशभूषा चाचपून नीट केली
स्टेजवर एकदम एन्ट्री घेतली ती टाळ्यांच्या कडकडाटात
वाक्याची फेक अशी की प्रॉम्प्टर, नाटककार, नाट्यसमीक्षक
मूळसंहिता, चष्मा, कान शोधण्यात दंग

‘वाचा’ जुनी बंद झाली मागे
म्हणून उपेक्षित सेमिनार्समधून बंदुकीचे बार काढले
येडपटांना जाळ्यात पकडण्यासाठी जुगारवाले
दोनचार बनावट गिऱ्हाईके ठेवतात तसे
हातपुसण्यांना सेमिनार्समधून वापरले

इतके योजनाबध्द, पुन्हा सशासाठी वाघाच्या
शिकारीची तयारी की,
अश्वमेधाचा घोडा धरणे सोडा, टापांच्या आवाजाने
लोक पळू लागले
‘मराठी समीक्षक कळवा अन् हजार रुपये मिळवा’
असे भिंतीभिंतींवर लिहिल्याने
टीका करायला कुणी उरलेच नाही

गैरसोयीची तितकी बंधने तोडली, सोयीची तेवढी मानली
खंत वाटणाऱ्या गोष्टींचा पहाटे पाचपर्यंत जागून
ताळेबंद केला
कॉलेज बदलणे या अनुभवाचे भांडवल केले
विद्यापीठात नोकरी पकडून
अपयशाला थोर मानले
ही यशाची सर्वात मोठी गुरूकिल्ली ठरली
तरीही पुचोळाभर मुलाखतींनी ** पुसून घेतली स्वतःची

एक चुकलं
ते उघड कबूल करण्याचा प्रश्नच नाही म्हणा
पूर्वीच्या प्रेयसींना लिहिलेली पत्र नव्या बायकोच्या
संसारात छापून येत आहेत
प्रेम आणि एकपत्नीत्वातली विसंगती
सुचवू पाहताहेत साले प्रच्छन्नपणे

वास्तविक लेखक ते लेखकराव असाच हा विकास
ते सोडा... प्रीती परि तुजवरती... असं काही रचू

सफल लेखकांच्या तावडीत सापडले की हे असे होणारच
परवडणारा नव्हता त्यांचा कळप
शिवाय त्यांच्या श्रेणीत सिनियारीटी मार खाते
म्हणून निव्वळ बालविधवा लेखकांचा स्वामी झालो आयता

© विश्वास वसेकर
---------------------
प्रथमपुरुषी एकवचनी
( भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी )..............कवी : दासू वैद्य ( कविता-रती, दिवाळी २०१३ मधून )
-----------------------------------------------------------------
प्रथमपुरुषी
एकवचनी,
वणवण भटकला,
प्रत्येकाने हटकला,
जमेल तिथे स्पष्टीकरण
शक्य तिथे तुष्टीकरण.
राहिला चालत,
आवरेना सुसाट सुटलेलं कथानक
मानवेना रचनेची परंपरा
उपकथानकातल्या अनपेक्षित घटना
घुटमळू लागल्या पायांत,
अगम्य हेलकाव्यांनी
हिंदकळू लागलं अस्तित्वाचं पाणी,
आधार म्हणून कधी ओढ म्हणून
बिलगत गेला एकेका नात्याला.
अडकला पात्रांच्या दाट जाळीत
पसरला जलरंगासारखा भाषेमधून,
कथानकाची गाडी
शेवटच्या स्टेशनात येऊन थांबल्यावर
चाचपले त्याने स्वत:चे खिसे,
खिशात सापडलेल्या
तिकिटावरच्या गावाची अक्षरं
स्टेशनवरच्या नावाशी
किंचितही नव्हती जुळणारी.
तरीही उत्सवी लोक होतेच बाहेर
स्वागताला उत्सुक,
उद्‌घोषणांच्या गोंगाटात
लोक वाजत-गाजत घेऊन गेले
यशस्वी कथानकाला,
प्रथमपुरुषी एकवचनी
शोधू लागला स्टेशनबाहेर
टॅक्सी, रिक्षा, टांगा
इप्सित स्थळी पोचण्यासाठी.

----------------------------------------------
कवितेच्या शीर्षकाखाली कंसात "भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी" असे लिहून कविता करण्याची ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी श्री. दासू वैद्य ह्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. एकेकाळी कवियत्री इंदिरा संत ह्यांनी "केशराचा मळा" ह्या शीर्षकाची कविता श्री. ना.सी. फडके ह्यांच्यावर केलेली मला चांगलीच आठवते. ही जुनी पद्धत असली तरी एका कवीवर, साहित्यकावर कवितेतून केलेली ही अप्रतीम अशी समीक्षा म्हणता येईल.
नेमाडेंना ज्या गावी जायचे होते तिथे ते पोचले नाहीत आणि तरीही लोक त्यांचे स्वागत, उद्‌घोष करीत आहेत असे निष्कर्षाचे वाक्य ह्या कवितेत मोठे कळीचे आहे. नेमाडेंचे सुरुवातीचे लेखन पाहता त्यांना समीक्षेच्या गावी जायचे होते असे कोणालाही वाटते. पण त्यांनी नंतर केवळ कादंबरीची कास धरली व ते भलत्याच गावी पोचले असे कवीला वाटत असावे. किंवा पुरस्कारांच्या भाषेत बोलायचे तर नेमाडेंनी बहुदा "तिकीट" काढलेले गाव "ज्ञानपीठ"चे असावे व ते पोचले फक्त "साहित्य-अकादमी"ला, असाही सूर वरील कवितेतून जाणवू शकतो. अर्थात इथे "ज्ञानपीठ" ऐवजी नेमाडे "नोबेल"चेही तिकिट काढते तरी पोचलेल्या गावी त्यांचा सत्कारच होता. इथे दासू वैद्य समीक्षेच्या पद्धतीने हे दाखवू इच्छित आहेत की त्यांनी जी "प्रथमपुरुषी-एकवचनी" अशी कादंबरीतून शैली अवलंबिली, ( आत्मकथा व काल्पनिक कादंबरी ह्यांचे मिश्रण केले ), त्याने त्यांच्या उपकथानकातल्या पात्रांशी बरेच घोटाळे झाले, त्यांच्या अस्तित्वाचं पाणी ( पोटातलं ) हिंदकळू लागलं. तसेच दासू वैद्य नेमाडेंना त्यांच्या कादंबरीतल्या भाषासौष्ठवासाठीही दाद देत आहेत ते "पसरला जलरंगासारखा भाषेतून"  असे म्हणत. हे अप्रतीम भाष्य समीक्षेच्या प्रांतात गद्यात अशक्यच झाले असते इतके ते इथे काव्यमयरीतीने अवतरले आहे.
नेमाडे "हिंदू" ही कादंबरी, तीन भागात ( अशी त्यांची जाहीरात होती ) आणि गेली ३०/३५ वर्षे लिहीत होते ह्या सृजन-उन्हाळीवर दासू वैद्य अशी टिप्पणी करीत आहेत की "आवरेना सुसाट सुटलेलं कथानक, व मानवेना रचनेची परंपरा !". ही मोठी मार्मिक टिप्पणी असून ते नेमाडेंच्या आवाक्यावर भाष्य करणारे आहे.
जसे परंपरेने आपण घेतलेला वसा टाकत नाही तसेच कदाचित नेमाडे जी शैली ( प्रथमपुरुषी-एकवचनी ) आजही टाकत नाहीत त्यावर दासू वैद्य म्हणत आहेत की शेवटच्या स्टेशनावर पोचल्यावरही ह्या लेखकाला अजूनही टॅक्सी, रिक्षा, टांगा यासारखे एखादे वाहन इप्सित स्थळी पोचण्यासाठी शोधावे लागत आहे. हे एकप्रकारे प्रत्येक लेखकाचेच भागधेय असल्यासारखेही आहे.
कवितेतून समीक्षा करण्याचा हा अनोखा प्रकार आहे आणि त्यात श्री.दासू वैद्य यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------


शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

प्रसिद्ध भाषाशास्त्री अशोक केळकरांची "कोसला"वरची मते :
----------------------------------
प्रसिद्ध भाषाशास्त्री श्री. अशोक केळकर हे प्रकांड पंडित, विद्वान, भाषाशास्त्री असून ते नेहमी हसत खेळत आणि एक प्रगल्भ विनोदबुद्धी ठेवून रोखठोक लिहितात. त्यांनी "कोसला" ह्या कादंबरीवर जे परिक्षण ( पृ.२४२-२४५, रुजुवात ) लिहिले आहे त्यातले काही मोजके अभिप्राय पाहण्यासारखे आहेत :
१) "अमेरिकन लेखक जे.डी.सॅलिंजर ह्यांच्या "The Catcher in the Rye ( 1951)" ह्या कादंबरीशी प्रस्तुत कृतीची तुलना केली गेली आहे, तिच्याबद्दल दोन शब्द. कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की, वाङ्मय फौजदारांना ह्यामध्ये काही मसाला मिळण्यासारखा नाही. साम्यस्थळे जरूर आहेत, पण भेद अधिक महत्वाचे आहेत.
The Catcher in the Rye ही जास्त यशस्वी कादंबरी आहे. जीवनाचा एक पट प्रथमपुरुषी निवेदनात उलगडून दाखवणे आणि कथेतल्या "मी’ला धक्का न लावता सांगायचे ते सांगून टाकणे हा तांत्रिक प्रस्न सॅलिंजर पुढेही आहे आणि तो त्याने निराळ्याच पद्धतीने सोडविला आहे.
फरक पडतो तो काय सांगायचे आहे ह्याबद्दल. "कोसला" ही अधिक गंभीर ( म्हणजे Serious; solemn नव्हे, भारतीयांच्या मनातली एक नेहमीची गल्लत ! ) कादंबरी आहे".
२) "लेखकाचे माप ह्याप्रमाणे त्याच्या पदरात घातल्यावर ( म्हणजे having given the devil his due असं मला म्हणायचं होतं ) आपल्याला एक भयानक शंका ग्रासू लागते. पांडुरंग सांगवीकर अखेर निमित्तमात्र. ज्या मृतांचे धर्म निरूपावयाचे आहेत ते शंभरातले नव्व्याण्णव नव्हे. तर स्वत:ला मृत ठरवणारे एक--जीवनमृत. कादंबरीच्या मीच्या आतला मी--गिरधर. ज्याला "स्वदेशबंधु त्याज्य : स्वग्रामबंधु त्याज्य ; संबंधित : यांचा संबंधु : तो विशेषत: त्याज्य, " ज्याला घरी राहणे दिवसेंदिवस जड होते, काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म.
अनुभवाचे विघटन, त्याचे "वगैरे"करण ही नुसती सुरुवात, जमीनीची नांगरट. त्यात पेरणी करायची, ती आपण एकटे आहोत, काम्युने चितारलेला outsider आहोत, ए.ई.हाउसमनने व्यक्तविलेल्या " a stranger and afraid, In a world I never made" ह्या जाणिवेची. आधुनिक मानवाच्या विचार-कल्पनाविश्वातली ही एक महत्वाची जाणीव. हिची जातकुळी एकीकडे शेक्स्‌पियरच्या हॅम्लेटपर्यंत पोचते; दुसरीकडे बौद्ध, जैन, ह्यांच्यापर्यंत. आधुनिक मराठी साहित्यापुरते म्हणायचे तर मर्ढेकरांचे नाव सुचते . पण मर्ढेकरसुद्धा एक आनंदी, आशावादी प्राणी होता असे तुलनेने वाटावे इतके हे दुखणे विकोपाला गेले आहे.
माणसाला संवेदनक्षमता जरूर असावी. पण तो अवघा संवेदनाच होऊन गेला, "सम्‌" जाऊन वेदनाच शिल्लक राहिली, तर ज्या विश्वाची चिंता करायची त्या विश्वाशीच संबंध तुटतो---"जैसा स्वये बांधोन कोसला मृत्यू पावे".
आता ह्या केळकरांच्या अभिप्रायाचा काय अर्थ निघतो ? एक तर सॅलिंजरची कादंबरी निवेदन शैलीने जास्त यशस्वी आहे व "कोसला" नाही . कारण नेमाडेंना काय सांगायचे आहे तेच डेंजरस ह्या अर्थी गंभीर आहे. आणि दुसर्‍या परिच्छेदात ते कसे चूक आहे ते दाखविले आहे. एकटेपणाची जाणीव जरी वैश्विक असली तरी "काही एक करायचे नाही हेच ज्याचे विहित कर्म" ही विचारसरणीच कशी चूक आहे ते केळकर एका उदाहरणाने सांगत आहेत. एखाद्या पक्षाने घरटे ( कोसला ) बांधावे पण स्वत: मरून जावे तशीच ही नेमाडे सांगताहेत ती जाणीव आहे. ह्यापेक्षा तिखट अजून कोण लिहिणार आहे नेमाडेंच्या "कोसला"-पद्धतीच्या विचारांवर ?
-------------------------------------------- 

मंगळवार, ११ जून, २०१३

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19295542.cms

संजय पवार ह्यांचा लेख वाचा : शंभरातील नव्याणवांना हे समजेल ? 

----------------------------------------
नेमाडे असे का वागतात ?
---------------------------
विचारवंतांचे वलय अनेकांना मोहविते. ते नेमाडेंनाही आकर्षित करीत असेल तर त्यात वावगे नाही. पण विचारवंतांचे मुख्य कसब असते ते म्हणजे तर्क. आणि शिस्तशीर, पद्धतशीर विचारांची मांडणी, त्यांची समर्थने व संदर्भ. कुठलाही पीएच.डी.चा प्रबंध पहा त्यात हीच शिस्त दिसेल. पण हे नेमाडेंनी कधी केले नाही. केले ते फक्त "टीकास्वयंवर", देशीवादावरचे काही लेख ह्यामधून. बरे त्यातही आपले गैरसमज दडपून सांगणेच ज्यास्त केले आहे. आता हे वैगुण्य भरून काढायचे तर तर्क-सदृश रकानेच्या रकाने ते आपल्या कादंबर्‍यांतून वा पात्रांमार्फत ठोकून देतात. त्यांना वाटते की ह्यात काही अंगलट आले तर ह्या पात्रांची चोरवाट आपलीच आहे. पण आजकाल असे होत नाही. बखिन ह्यानेही कबूलले आहे की पात्रांची मते ही लेखकाचीच असतात.
ई-संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रथमच ते कबूलतात की मी संगणकात अज्ञ आहे. पण ह्या संगणकाच्या वापरामुळे कागद किती वाचतो त्या फायद्यासाठी मी ह्या ई-संमेलनाला कबूल झालो. तर्काची, ज्ञानाची एक अट अशी असते की आपल्याला माहीत असो वा नसो आधी त्यावरचा ज्यांनी चोखंदळपणे अभ्यास केला आहे ते पहावे. आता कोणीही गुगलवर चौकशी केली तर त्याला कळेल की ह्या संगणक प्रणालीत इतकी प्रचंड वीज लागते की गुगल, इंटेल वगैरे कंपन्या आता वीज-निर्मीतीत उतरलेल्या आहेत. अशा अवस्थेत कागद वाचतो हे समजणे अगदी बावळटपणाचे आहे. एखाद्या साहित्यिकाने त्यावर न भाष्य करणे रास्त ठरते पण "मी विचारवंतच" हा ज्यांचा समज असतो त्यांना ठामपणे असे फशी पडावेच लागते. जर ते आपले क्षेत्र नाही तर सामान्य माणूस थोडी चाचपणी करतो, माहीती काढतो, पण त्याचे जातीवंत विचारवंताला काय हो ?
ज्या त्यांच्या मुलांनी प्राध्यापकी नाकारली व परंपरा मोडत "पसायदान" शिकवीत बसले नाहीत त्याच मुलांच्या लग्नात नेमाडेंनी कसे पारंपारिक रीती आचरल्या वगैरे हकीकती त्यांच्याच शिष्यांकडून ऐकू येतात, ते एकवेळ खाजगी बाब म्हणून सोडले तर ह्या विचारवंताला हा तर्क कसा समजत नाही की असे म्हटल्याने ज्ञानेश्वरांचे पसायदान हे कमी प्रतीचे ठरते व नेमाडे तर स्वत:ला परंपरावादी/देशीवादी म्हणवतात . त्यात तरी हे कसे बसवावे ?
विचारवंतपणाचा हा मोह भल्या-भल्यांना वेड लावतो. निदान जरा जुजबी अभ्यास तरी करावा, अगदी नेमाडपंथी विचारवंतांनी-सुद्धा !
-------------------------------------

रविवार, २४ मार्च, २०१३

नेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास वळवायचा आहे.

---------------------------------------------------------------------------
नेमाडेंना इतिहासाची शिस्त नको, पण इतिहास हवा तसा वळवायचा आहे.
--------------------------------------------------------------
    पार्ल्याच्या एका देशीवादाच्या भाषणात मी नेमाडेंना प्रश्न विचारला होता की तुम्ही हिंदूत ज्ञानेश्वरांची, रामदासांची, बुद्धाची जी टिंगल केली आहेत ते पुस्तक खपावे म्हणून केले आहे काय ? ह्यावर ते म्हणाले होते की टिंगल करायचा त्यांचा उद्देश नव्हता, पण सामाजिक संदर्भ उपलब्द असावेत म्हणून त्यांची हिंदू त योजना केलेली आहे. ह्याच हिंदू च्या प्रमोशन मध्ये ज्या ज्ञानेश्वरीची मुंबई विद्यापीठाने संशोधन करून आवृत्ती काढली त्या राजवाडेंबद्दल "हा म्हातारा इतका धूर्त होता की त्याने पदरच्या ओव्या घुसडल्या असल्या पाहिजेत अशी शंका येते" असे म्हटले आहे. जर लक्षपूर्वक पाहिले तर नेमाडे हे निबंध क्वचितच लिहितात. कारण निबंधात तर्काचे, योग्य संदर्भांचे बंधन येते व पुरावे द्यावे लागतात. त्यामानाने कादंबरीत काहीही ठोकून द्यायची मुभा असते. त्यामुळे कादंबरी लेखन हे नेमाडेंचे एक प्रकारे इतिहासाचे पुनर्लेखनच आहे. अर्थात ते तसे करण्याची त्यांना मुभा व अधिकार आहेच. पण नामदेवांना मध्यवर्ति स्थान हवे असे म्हणताना ऐतिहासिक लेखन न करता भावनिक आवाहन करणे हा एक व्यूहाचाच भाग होतो. जसे हिंदूत नेमाडेंनी महानुभाव पंथाच्या नायकाच्या आत्येला केंद्रस्थानी आणले आहे.
    नेमाडेंची जात वा धर्म काढणे हे तसे प्रशस्त नाही. पण मनोविश्लेषणात्मक समीक्षेच्या अंगाने ते स्वत: महानुभाव पंथाचे असल्याने त्याचे त्यांच्यावर काही प्रभाव उमटले असतील का हे पाहणे रास्त ठरावे. शं.गो. तुळपुळे ह्यांच्या ग्रंथात नुसती श्रीकृष्ण-स्वयंवराची प्रकरणे पाहिली तर दिसते १) नरेंद्र व नृसिंह यांची रुक्मिणीस्वयंवर काव्ये २) संतोषमुनीचे रुक्मिणीस्वयंवर ३) कृष्णमुनि-कविडिंभ-कृत नवखंड-रुक्मिणीस्वयंवर ४) लक्षधीर-कृत रुक्मिणीस्वयंवर ५) एल्हाणाचे रुक्मिणीस्वयंवर ६) हंसबा स्वयंवर इतकी ती मुबलकपणे असताना नेमाडेंच्या  एकमेव समीक्षाग्रंथाचे शीर्षक "टीकास्वयंवर" असावे हे ह्याच प्रभावाचे लक्षण दाखवते. तसेच इतिहास आपल्याला पाहिजे तसा लिहायला हवा हे महानुभाव पंथात सवयीचे असले पाहिजे अशा अर्थाची मराठी विश्वकोशातली ही टिप्पणी पहा : "भासकरभट पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपुरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. "* ( लिहिण्यातल्या चुका मुळातल्याच आहेत. मी फक्त कॉपी पेस्टले आहे ). आता असे महानुभाव पंथात घडत असेल तर साहजिकच त्यांना हिंदूंच्या ग्रंथातही असे व्हावे असे वाटू शकते व त्याच प्रमाणे त्यांचे व्यूह असणे स्वाभाविक ठरावे. असेच आता अनेक संतांचे भाग्य ते उजळू शकतील !
-----------------------------------------------
* पहा "मराठी विश्वकोशातले हे पान : लिंक : http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10505

गुरुवार, २१ मार्च, २०१३

दुय्यम दर्जाच्या लोकांना येतेय महत्व !

-------------------------------------------
दुय्यम दर्जाच्या लोकांना येतेय महत्व
-------------------------------------
    प्रथम नेमाडेंचे आभार की त्यांनी एका दुय्यम दर्जाच्या कवीचा ( पहा टीकास्वयंवर पृ.११५) म्हणजे आंग्ल कवी टी.एस.इलियट चा इतका आदराने उल्लेख केला आपल्या अध्यक्षीय भाषणात ( पहा : युनीक फीचर्सचे तिसरे मराठी साहित्याचे ई-संमेलन ). त्यामुळे काय कारण असावे ह्या कवीचा असा अध्यक्षीय भाषणात उद्धार व्हावा, ते शोधणे क्रमप्राप्तच होते.
    नेमाडेंचा विषय चालला आहे देशीवाद हा . त्यात इलियट हाही कसा परंपरावादी होता हे सांगत ते त्याच्या कंडोम वापराबाबतचे मत देत आहेत, "टी. एस. इलियटचंही एक उदाहरण या संदर्भात देता येईल. त्या काळात इंग्लंडमधे कंडोम वापरण्याचं शिक्षण मुलांना द्यावं किंवा नाही यावर वाद सुरू होता. त्यासंबंधी इलियटला विचारलं, तर तो म्हणाला, ‘असं शिक्षण अजिबात देऊ नये. कारण मुलांना हे कळलं पाहिजे की, आपली बायको सोडून दुसरीकडे जाणं बरोबर नाही. आपल्या परंपरेतच ते आहे. कंडोम वापरण्याचं शिक्षण देऊन गुप्तरोग काही कमी होणार नाही, फक्त कंडोमनिर्मितीचे कारखाने मात्र चालतील.’ इलियटसारखा मोठा कवीसुद्धा परंपरा मानणाराच होता."
    प्रथम तपासणे आले की इलियट खरेच असे म्हणाला होता का ? असल्यास का ? तर असे सापडते की इलियट असे म्हणाले होते की कंडोम वापरून आपले स्वास्थ्य सांभाळण्यापेक्षा आपले चारित्र्य ( दुसर्‍या बाईकडे न जाणे) सांभाळणे हे ज्यास्त महत्वाचे आहे व शालेय शिक्षणात त्यावर भर असायला हवा. ( T.S. Eliot (1886-1965), poet and critic, wrote that modern thinkers are always “dreaming of systems so perfect that no one will need to be good.” Some views of sex education display this mentality. They assume, in Barbara Dafoe Whitehead’s words, “a deeply technocratic understanding of teenage sexuality.” In other words, “once teenagers acquire a formal body of sex knowledge and skills, along with the proper contraceptive technology, they will be able to govern their own sexual behavior responsibly.”

Responsible sexual behavior, in this view, does not involve virtuous ordering of one’s sexual feelings, passions, and emotions for the sake of making morally good choices. Rather, all that’s required to be sexually “responsible” is a condom. Allegedly, one can avoid both pregnancy and sexually transmitted diseases with this contraceptive technology. It is the quick fix, technical solution for avoiding harm, in short, “safe sex.” The assumption seems to be that harming one’s health is the only issue at stake. Totally ignored is the question of harming one’s character, of being morally good. Indeed, as William Kilpatrick rightly says, “The link between sex and character is a missing link in sex education.” )
 ह्याबद्दल दुमत नसले तरी समाजमनाला संततीनियमनाचे पर्याय उपलब्ध असलेच पाहिजेत ह्या आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या सोयीसाठी कंडोम वापरावर अवश्य भर द्यावाच लागतो, आधुनिक काळात.
    आता म्हणे येऊ घातलेल्या कादंबरीतून ( हिंदू २ व ३) नेमाडे म्हणताहेत की मी हिंदू धर्मात परंपरा जोपासत लोकांनी कसे बदल घडवून आणलेत ते दाखवणार आहे. आत्ता आपल्या लक्षात येईल की इलियटचे संदर्भ का येत आहेत. कारण टी.एस.इलियट ह्यांचा एक प्रसिद्ध निबंध आहे Tradition and Individual Talent ( परंपरा आणि वैयक्तिक कर्तब ) . ह्या निबंधात इलियट न्यू क्रिटिसिझमचे तत्व मांडत सांगत आहेत की कोणताही बदल नवीन लेखक करतो तेव्हा तो परंपराही पाळत असतो. हेच तर नेमाडे देशीवादातून मांडत आले आहेत.
    ह्या देशीवादावर अगदी सामान्यांना समजेल असे थोरात ह्यांनी देशीवाद : भूमिका आणि उपयोजन ( पृ. १७९ , साहित्याचे संदर्भ ) ह्या लेखात फार छान मांडले आहे. थोरात म्हणतात : " जे आहे ते बरोबरच आहे, किंवा एखादी गोष्ट आहे म्हणून ती बरोबर आहे, अशी ही भूमिका आहे. मूल्यांच्या निर्मितीचा आणि अनुभवांच्या अर्थनिर्णयनांचा अधिकार पूर्णपणे संस्कृतीच्या हाती सोपवला की तिची आतून किंवा बाहेरून केली जाणारी चिकित्सा अशक्य होते. तिच्याबद्दल कोठल्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित करता येत नाहीत. उदाहरणार्थ व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा गैरलागू ठरतो, कारण ते पाश्चात्य मूल्य आहे. जातपात न मानणे चुकीचे ठरते, कारण जातिव्यवस्था हे भारतीय संस्कृतीने आपल्या नागरिकांना मानाने जगण्यासाठी उपलब्ध करून दिलेले उपकरण आहे.....एखादी गोष्ट आहे म्हणून ती बरोबर आहे, ही भूमिका बदलाला नकार देणारी, उदारमतवादाला विरोध करणारी आणि सनातनी आहे. परिस्थिती आहे तशी ठेवण्यात ज्यांना रस असतो, अशा लोकांच्या ती सोयीची आहे."
    तर असा नेमाड्यांना देशीवादाची स्फूर्ती देणारा, नोबेल पारितोषिक मिळालेला ( पहिल्या पत्नीला वेड लागल्यावर तिला १५ वर्षे न भेटणारा व ६८ व्या वर्षी ३० वर्षाच्या सेक्रेटरीशी लग्न करणारा ( ती मागच्याच महिन्यात वारली ), हा आंग्ल कवि त्याच्या प्रसिद्ध "द वेस्ट लॅंड" ह्या कवितेची शेवट "शांती शांती शांती" अशी करतो तेव्हा तो जणु नेमाडेंचाच देशीवाद उचलून धरत आहे असा नेमाडेंना भास झाला असल्यास नवल नाही.
    दुय्यम लोकांना आजकाल महत्व येते आहे हे मात्र खरे !
--------------------------------------------------------------