---------------------------------------------------
रंगनाथ पठारेंनी तरी समजवावे ह्यांना....
----------------------------------------
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी समीती नेमण्यात आलेली आहे ती प्रा.रंगनाथ पाठारे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे व त्यांचा अहवाल अजून सरकारला मिळायचा आहे. त्यानंतर एका वर्षात कदाचित हा दर्जा मराठीला मिळू शकतो. मागच्या वर्षी मळ्याळम भाषेला हा दर्जा नाकारण्यात आला होता व ह्या वर्षी त्यांना तो देण्यात आला. ही व इतर माहीती खाली दिलेल्या लेखात अवश्य वाचा.
तसेच प्रा.रंगनाथ पठारे ( हे फेसबुकवर आहेत ) ह्यांना कळवा की जर कोणी ह्या प्रयत्नात खीळ घालत असतील किंवा मराठी ही प्राचीन भाषा नाही असे म्हणत असतील तर त्यांनी त्यांना बिनदिक्कत छान समजवावे....
उदाहरणार्थ : आपली येऊ घातलेली कादंबरी खपावी म्हणून नुकतेच नेमाडे ह्यांनी असे विधान केले आहे की पुणेरी मराठी ही भाषाच नसून ती प्राचीन तर नाहीच. त्यांच्या मते ते बोलत असलेली खानदेशी भाषा हीच प्राचीन आहे. आजकाल खपाच्या दृष्टीने अशी काही खळबळ किती कामाची असते ते मला नुकतेच ध्यानात आले. आमच्या लायन्स क्लबचा एक सभासद मला परवा विचारीत होता की ए नेमाडे कौन है ? मी त्याला का? असे विचारल्यावर तो म्हणाला की माझ्या फेसबुक भिंतीवर त्याने माझे काही वाचले व म्हणून तो विचारीत होता की ये नेमाडे कौन है, जिससे तुम्हारा पंगा चालू है ? .....पहा , कशीही मिळणारी प्रसिद्धी कशी कामाची असते...
-----------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा