शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे---५
वारकर्‍यांवर वार !
नेमाडेंना तुकारामाबद्दल आदर. मौखिक परंपरा, साधी राहणी, एकमेकांच्या पाया पडणे, वारी, ह्यासाठी त्यांना वारकर्‍यांबद्दल प्रेम असावे, असे त्यांच्या आत्तापर्यंतच्या लिखाणावरून वाटते. पण हे काय ?
"हिंदू त (पृ.४४०):वर : पैठण. वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारा-मांगानासुद्धा वारकर्‍यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरच. विठ्ठ्लाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपूरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून...एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंछ यावनी पदार्थ कसे काय चालतात ? "
महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने वारी करणारा हा केवढा समानतेचा आदर्श असणारा हा संप्रदाय. पण स्वत: महानुभावी पंथाचे असलेल्या नेमाडेंना त्यात वैगुण्यच दिसते. ते सगळ्यांनाच शिव्या देतात असा आव आणतात. मग पुस्तकात कुठेच नायक असलेल्या खंडेरावाच्या महानुभाव पंथाचे काही विश्लेषण का नाही ? उलट आत्या महानुभाव पंथाची संन्याशीण असते तिचे किती उदात्त भव्य चित्रण .मुसलमानांबद्दल का मूग गिळून गप्प ? नायक तर पाकीस्तानात असतो.त्याला भरपूर वाव होता.
ह्या नेमाने शिव्या घालण्याच्याच कसबाला दाद म्हणून, नेमाने नेमाडे असा हा प्रतिसाद !
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा