समर्थ कादंबरीकार नेमाडे,---रामदासांचा सन्मान करण्यात असमर्थ !
"हिंदू" ही नुकतीच प्रचंड खपाची समर्थ कादंबरी लिहिणारे भालचंद्र नेमाडे, समर्थ रामदासांची कशी ससेहोलपट करतात, हे पृ.४५० वर पहा:
"रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै..."
असा शिष्टाचार आहे की जनमानसात ज्यांना मान आहे अशा संत व्यक्तींना संबोधताना आदरार्थी वचन, भाषा वापरावी. पण नेमाडेंनी तर "निश्चित नैतिक" भूमिका घेतलेली. मग ते काय नरमतात किंवा नम्रतात ? पळपुट्या काय नागड्या काय ! मनाचे श्लोकला जनाचे श्लोक करणे, तर खूपच मऊ. बरे समर्थ रामदास एकवेळ ब्राह्मण ( व ब्राह्मणांना सध्या वाईट दिवस म्हणून ) एकवेळ जाऊ दिले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्माचे पुनरुथ्थान केले त्यातल्या गौतम बुद्धाने काय घोडे मारले आहे ? मुलगा झाल्यानंतर बायकोला सोडले, तर स्त्रीवादाचा पुळका आलेल्या नेमाडेंना तो अनादरणीय व नेमाडे बायकोला सोडून गेले, त्यांचा अमेरिकेतला मुलगा त्यांना विचारेनासा झाला तर ती आत्मनिष्ठा व गौरव करणारी बाब ? हा न्याय खासा नेमाडेपंथी असला तरी धिक्कार करण्या योग्यच ! ब्राह्मणांनी व बुद्ध धर्मीयांनी.
नेमाडेंचा शूरपणा पहायचा तर त्यांनी मोहमदा संबंधी असे लिहून दाखवावे व मग आपण त्यांना मानू . तूर्त धिक्कारूच !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा