बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू" : भालचंद्र नेमाडे----२
ज्ञानेश्वरांचा काळ ७५० वर्षांपूर्वीचा. त्यांनी बर्याच प्रसंगी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे, ही बाब खरी असेल. पण हे जे वचन दिले आहे त्याने असा काही अर्थ निघत नाही.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ ह्यात कोठेही जातीव्यवस्थेचा उल्लेख येत नाही वा व्यक्तीश: वेसकरावर काही ताशेरे नाहीत.
आता नेमाडे म्हणतात की हा एक दृष्टांत आहे. काव्यशास्त्रात दृष्टांत हा अलंकार, व्याख्या करताना, म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास, दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. शिवाय ही युगत बख्तिनने कुठेही सांगितलेली नाही. त्याने संवादाबाबत जे सांगितले आहे (की मी-दुसर्यांबरोबर व दुसर्यांना-मी कसा वाटतो ह्या विषयी जे संवाद होतात त्यात कुठे तरी खरेपणा असण्य़ाची शक्यता असते), तसे इथे कुठले संवाद लेखकाने दिलेले नाहीत. फक्त कौतुकाची बाब अशी की नेमाडेंचे "निश्चित नैतिक भूमिकेवर ठाम राहणे" इथे प्रभावी आहे. ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी "स्टार-माझा" वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. अर्थात "न्यू क्रिटिसिझम"च्या विचारप्रणाली प्रमाणे कलाकृतीबाह्य मुलाखतीला आपण महत्व देऊ नये हे खरेच आहे. पण जनसामान्यात आदराचे स्थान असणार्या ज्ञानदेवांवर हे किटाळ आणण्यापूर्वी निदान बख्तिनने असे कुठे सांगितले आहे का असा अदमास तरी त्यांनी घ्यावयास होता. ज्ञानेश्वरांची वा ब्राह्मणांची ही अवहेलना होत असेल तर ते तशी प्रतिक्रिया यथावकाश देतीलच.
आता दोन उतारे घेऊ: ( ते एकत्र घेण्याचे कारण त्यात दोन्हीतही समान धागा आहे.)
पृ.२५३, हिंदू मध्ये हे पहा :"शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस...
पृ.४५० वर पहा:"रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै..."
कादंबरीतले एखादे पात्र समाजाच्या अशा थरातले असेल की जिथे कोणाबद्दलच आदर नाहीय व सगळ्यांना नुसत्या शिव्याच देण्यात येतात तर ते त्या पात्राचे बोल समजायचे का लेखकाचे ? ह्यावर नेमाडेंना आदर असलेल्या बख्तिन ह्यांनी पृ.३३३ ( द डायलॉगिक इमॅजिनेशन ) स्पष्ट असे भाष्य केले आहे, ते असे ( मुक्त भाषांतर): "वैयक्तिक पात्रे आणि त्यांचे भागधेय, आणि वैयक्तिक पात्रांची भाषिते ह्यांची कादंबरीला काही काळजी नसते. पात्रांच्या भाषितांची उठून दिसणारी ओळख अशी की ती भाषिते एका ठराविक सामाजिक वैशिष्टयांची असतात, एक सामाजिक रुंद पदर दाखवतात. अशी भाषिते सूप्त भाषांची दमदार शक्यता दाखवितात. अशा भाषितांमुळे कादंबरीत मतांचे बहु-आवाजी आयाम तयार होतात. ( बख्तिन निरनिराळे लोक जे संवाद करतात त्यात सत्य सापडण्याची शक्यता वर्तवताना ह्या बहु-आवाजी आयामांना महत्व देतो.)."
म्हणजे बख्तिनच्या म्हणण्यानुसारसुद्धा पात्रांची भाषा ही लेखकाचीच भाषा ठरते, व त्या भाषेतल्या वैगुण्याबद्दल, प्रमादाबद्दल लेखकच जबाबदार ठरतो. असेच कादंबरीत लेखकाचे एखादे भाषण (डिस्कोर्स )असेल, तत्वज्ञान असेल, तर ते नायकाचे समजायचे का लेखकाचे ? ह्या विषयीही बख्तिनचे म्हणणे बघण्यासारखे आहे. बख्तिन म्हणतो, ( पृ.३३२):" जी गोष्ट कादंबरीला कादंबरीपण देते व महत्वाची आहे ती म्हणजे, बोलणारी व्यक्ती व त्याचे भाषण. बोलणारी व्यक्ती व त्याचे भाषण, हा कादंबरीतला एक कलात्मक अविष्कार असतो. नाटकात असते तसे हे संभाषण नुसते दिले गेलेले नसते तर, ते लेखकीय भाषण असते. संभाषणाच्या इतर दुय्यम अंगांप्रमाणे ( जसे, काही वेळा गप्प बसणे, घटना, प्रसंगोत्पात बोलणे वगैरे ) ते मोघम नसते तर ते निश्चित असे सांगणे असते व त्यासाठी त्याची भाषा शब्द, व्याकरण हे खास असावे लागते. बोलणारी व्यक्ती म्हणूनच कादंबरीत एक आदर्शवाद्यासारखी असते. हे त्याचे बोलणे जगाकडे पाहण्याचा एक निश्चित दृष्टिकोन दाखवते. म्हणूनच ही भाषिते नुसतीच शब्दांचा केवळ एक दिशाहीन व्यापार न राहता लेखकाचे एक आदर्शवत बोलणे होते." हे नेमाडेंनी टिकास्वयंवर मध्ये कबूलले आहेच. ते असे : "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). असे जर निश्चित नैतिक भूमिकेतून वरील विटंबना करणारे लिहिल्या गेले असेल तर नेमाडेंनीच त्याचे उत्तरदायीत्व स्वीकारायला हवे. मतभेद सभ्यतेच्या चौकटीतही ते दाखवू शकले असते. मग ते का दाखवीत नाहीत ? कारण इथेही त्यांना बख्तिनच भडकवतो आहे. ( अर्थात ते त्यांना अजून उमगले नसावे.).
विडंबन ह्या जुन्या व लोकप्रिय प्रकाराबद्दल बख्तिन म्हणतो,(पृ.५१):"समजा एखाद्या सुनीताचे ( काव्यप्रकार), आपण विडंबन केले तर ते चांगले, वा वाईट असे असू शकते. पण ते त्यातल्या विषयाचे विडंबन न होता, सुनीत ह्या काव्याच्या प्रतिमेचे विडंबन होते"...(पृ.५५,५९,६१):"नालस्ती करणारे विडंबन हे धीरगंभीर एकतर्फी वर्णन करणार्या शब्दातल्या वस्तुस्थितीत किंवा गंभीर शब्दाच्या समीक्षेत खेळकर हास्याद्वारे एक प्रकारचे चूक-सुधारणे करते.धीरगंभीर वाङमय प्रकारात विरुद्ध अर्थाचे हे विडंबन बसत नसल्याने ते कादंबरीत एक प्रकारचे बहु-आवाज ( हेटरोग्लॉशिया ) तयार करते. ह्याच हास्यामुळे कादंबरीला एक महत्वाचा घाट येतो. जेव्हा कोणी एखाद्या विषयावर धीरगंभीर गद्य लिहितो तेव्हा ते त्या विषयाला अर्थ देणारे असल्यामुळे थेट प्रकारचे भाष्य असते. अशाच भाषेत देशाची मिथके, पारंपारिक कथानके तयार होत असतात. ह्या उलट विडंबनाची प्रकृतीच ह्याच्याबरोबर उलटी असते. तिचाही रोख कथानायकाकडेच असतो, पण हास्यामुळे ती वस्तुस्थिती व ते चितारणारे शब्द ह्यात एक अंतर निर्माण करते.सिमित शब्दप्रतिमांनी बंदिस्त केलेले वास्तव मग विडंबनामुळे सत्य वर्तविते."
बख्तिनचा हा सगळा शब्दांचा खेळ आहे. आचार्य अत्रे जेव्हा स.का.पाटिलांचे विडंबन करीत तेव्हा ते एखाद्या काव्यप्रकाराचे, किंवा कॉंग्रेसच्या ध्येयधोरणाच्या टीकेचे नसून चक्क स.का.पाटिलांचीच खिल्ली उडविणारे असायचे. ते शब्दांचा कितीही खेळ करून दाखवू गेले तरी सत्य, एक वाङमयप्रकार, चूक-सुधारणारे वगैरे काहीही न होता सरळ त्यांचीच वैयक्तिक, निंदानालस्ती करणारे असते. किंवा नेमाडेंचे वरचे उदाहरण घेतले तर "सावधान" म्हटल्यावर बोहल्यावरून पळ काढणार्या संत रामदासांनाच नेमाडे पळपुट्या, नागड्या म्हणत आहेत हे उघड आहे. ते काही ब्रह्मचर्य विरुद्ध संसारिक जीवन ह्या परिसंवादात वाद घालीत नाही आहेत. किंवा "तिसरे ते सावधपण । सर्वविषयी ॥"ह्या रामदासांच्या सूत्रासंबंधी विवाद निर्माण करीत नाही आहेत. ते सरळ स्त्रीवादाच्या कैवारापायी समर्थांना वाकुल्या दाखवीत आहेत. तेव्हा बख्तिनच्या कलागतीने, नेमाडेंनी केलेली ही नालस्तीच ठरते. बरे ह्याला काही नैतिक भूमिकेचा संदर्भ द्यायचा असता तर नायक खंडेरावही स्वत: लग्न करण्यास कचरतो आहे हे कसे ? कींवा विवाह ह्या कल्पनेविरुद्ध काही भाष्य असते व मग हे विडंबन असते तर मग बख्तिनचे म्हणणे लागू तरी पडते. किंवा ज्ञानेश्वरांचे वरचे विडंबन हे काही अभंग ह्या वृत्ताचे विडंबन नसून ते त्यांचेच विडंबन होते. एरव्ही ही चक्क बख्तिनच्या आडून केलेली निखालस नालस्तीच होते, अभिरुची सोडून केलेली. ज्ञानेश्वर, गांधी, व समर्थांच्या सेवकांना वक्र दृष्टीची. ( क्रमश: )
मंगळवार, १२ एप्रिल, २०११
शनिवार, १९ मार्च, २०११
बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू" : भालचंद्र नेमाडे
मिखाइल बख्तिन ह्यांचे एक पुस्तक आहे, "द डायलॉगिक इमाजिनेशन" ह्या नावाचे. त्यात कादंबरी ह्या प्रकाराचा मोठा आढावा घेऊन काही आडाखे निरिक्षिलेले आहेत. त्या अनुषंगाने भाषाशास्त्रातली काही तत्वेही दिलेली आहेत. ह्या पुस्तकाची ही प्रस्तावना करण्याचे कारण असे की "हिंदू" ही भालचंद्र नेमाडेंची कादंबरी बरीचशी ह्या बख्तिनच्या तत्वांनुसार लिहिली आहे असे जाणवते. (निदान अकादेमीचा पुरस्कार तरी त्यांना ह्याच कारणास्तव मिळणारा असावा !)
एक उदाहरण पहा: उदा: पृ.१५६ वर हे पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
बख्तिनचे म्हणणे असे की भाषेच्या प्रकारांमध्ये संवाद ह्या प्रकारात अर्थाच्या सर्वात ज्यास्त शक्यता आढळू शकतात. ह्या उतार्यात संवाद असा पारंपारिक प्रकारात दिलेला नाहीय, पण लेखक वा नायक तुमच्याशी संवादच करीत आहे ( "हे कोणाला सांगायचं तरी कसं ?"). त्यानंतर लेखक एक भाषण / ( डिस्कोर्स ) देत आहे, ज्यात तो सांगतो की वेसकराने धोतर वर करून बुल्ली दाखवणे हे ब्राह्मणांनी वेसकरांवर पूर्वी जे अत्याचार केले त्याची प्रतिक्रिया म्हणून "वर आलेला हा दाब" आहे. आता हे सांगतांना अर्थातच संवाद नाहीय, तर निश्चित नैतिक भूमिका घेऊन काढलेले अनुमान आहे. कशावरून हे खरे? तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. पण, जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, मुद्दाम, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा तर "दाब वर येणे" शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. अर्थात भाषाशास्त्रात कोणत्या जातीच्या लेखकांनी कोणत्या जातीच्या लोकांची बदनामी करावी, वा करू नये, ह्याचा काही दंडक नसल्यामुळे जी ती जात बदनामीची सुखदु:खे भोगतील. ( क्रमश: )

बुधवार, १६ मार्च, २०११
भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास:
भाषा व ज्ञानपीठे:
भैरप्पांची मूळ "दाटू" ही कन्नड भाषेत आहे तर नेमाडेंची "हिंदू" मराठीत आहे. ( तसे नेमाडेंचे शिक्षण इंग्रजी विषयात झालेले असले तरी ते आवर्जून कादंबरी मराठीतच लिहितात हे कौतुकाचे आहे.). कन्नड भाषेत आतापर्यंत सहा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत, मल्यालमला आठ, तर मराठीत फक्त तीन. तुकारामाने वर्णन केल्याप्रमाणे मराठीने कानडी नवरा केला तर फजीती होते, तसेच मराठी कानडी प्रादेशिक वाद अजून सुटलेले नाहीत. ह्यावरून कोणती भाषा श्रेष्ठ ते ठरवणे अवघड. त्यामुळे भाषेच्या एकमेकापेक्षा वरचढ असण्याचे आपल्याला काही निकष लावता येत नाहीत व तशी तुलना रास्त होत नाही.
ज्ञानपीठे किती मिळालीत त्यावरून भाषेच्या श्रेष्ठत्वाची तुलना करता येत नाही, असे असले तरी वस्तुस्थितीची मात्र तुलना होऊ शकते. त्यामुळे दोन्ही वाचकांनी आपापले रास्त अभिनिवेष जपायला हरकत नसावी. दोघेही स्वत:ला वाखाणणू शकतात. कदाचित कन्नडिगांना जरा ज्यास्त अभिमान असेल, ज्यास्तीच्या ज्ञानपीठांमुळे !
वाचनीयता वा रमणे ( इंटरेस्ट ) ह्या निकषावर "दाटू" किती तरी पटीने ज्यास्त वाचनीय व रंजक आहे तर "हिंदू" वाचायला अतिशय अवघड जाते, वाचवल्या जात नाही. आतापावेतो शंभर जणांनी ती वाचलेली आहे असे मला कळवलेले आहे. पण ह्या पैकी ८० जणांनी ती केवळ पहिली ७०/८० पानेच वाचू धजलो, पुढची वाचूच शकलो नाही असेही कबूलले आहे. एका ग्रंथपालाने तर सुरुवातीचा खप पाहता आम्ही खूप प्रती मागवल्या असे सांगितले पण आजकाल कोणी ही कादंबरी मागतच नाही असेही सांगितले. असे असले तरी "हिंदू" बरीच खपली हे मान्यच करावे लागेल. त्यामानाने "दाटू"च्या आवृत्या ज्यास्त झाल्या असतील, ती ग्रंथालयातून अजूनही ज्यास्त मागणीची असेल पण मार्केटिंगच्या बाबतीत जितका बोभाटा "हिंदू"चा झाला तितका "दाटू"चा झाला नाही.
शिवाय "हिंदू" प्रसिद्धीनंतरच्या काळातच नेमाडेंना पद्मश्री हा किताब मिळाला हेही नजरेआड करता येत नाही. असा कुठला किताब प्रसिद्धिनंतर भैरप्पांना मिळालेला नाही. त्यांना साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळालेला आहे तर नेमाडेंना महाराष्ट्र फौंडेशनचा . तसे जातीच्या तुलनेत पाहिले तर दोघेही आजकालच्या वजनदार जातीचे ( सत्ताधार्यांना योग्य वाटणार्या जातीचे ) लेखक आहेत व त्यात तुल्यबळ आहेत हेही निर्विवादच आहे.
पार्ल्याला देशीवादावरच्या भाषणादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे म्हणाले की मराठी पुस्तकांच्या विक्रीतून असे कितीसे पैसे सुटतात ? त्यामुळे खपाच्या दृष्टीने त्यांनी ह्या कादंबरीत काही क्लृप्त्या केलेल्या नाहीत. तरीही जर कोणाला ही कादंबरी आवडली नसेल तर ते त्या प्रतीचे पैसे परत द्यायला तयार आहेत. भैरप्पांनी अशी काही सोय जाहीर केलेली नाही. हाही प्रसिद्धीपश्चात व्यवहारातला महत्वाचा फरक म्हणता येईल.
( समाप्त )
--------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, ६ मार्च, २०११
नेमाने-नेमाडे
भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास:
पात्रे, चारित्र्ये व कथानक:
जोनॅथन कुल्लर नावाच्या समीक्षकाचे एक पुस्तक आहे, "स्ट्रक्चरलिस्ट पोएटिक्स" नावाचे. केंब्रिजच्या सेल्व्हियन कॉलेजचे हे प्राध्यापक. त्यांचे कादंबरीच्या रचनेसंबंधी असे म्हणणे आहे की ( पृ.२३०-२३८) पात्रांचे चारित्र्य हे कोणत्याही कादंबरीचे महत्वाचे अंग असते.कादंबरीतला सर्व पसारा केवळ पात्रांचे चारित्र्य उभारण्यासाठी असतो. ती साक्षात जीवनातली तर वाटलीच पाहिजेत, शिवाय त्या काळात ती आपल्याला सातत्याने धारदार होऊन आवडलीही पाहिजेत. हे खरे म्हणजे अगदी सामान्य वाचकाची अपेक्षाच व्यक्त करण्यासारखे आहे. ह्या दृष्टीने पाहिले तर नेमाडेंचे मुख्य पात्र भले उच्च शिक्षित आहे, नोकरी पुरातत्व खात्याची जरा वेगळी वाटणारी आहे, पण त्याच्या व्यक्तिमत्वाला आवडणारे विविधांगी कंगोरे दिसून येत नाहीत. त्यामानाने भैरप्पांच्या नायिकेची इतिहास शिक्षणाची सूप्त ईच्छा खूपच मोहक आहे. शिवाय तिचे वडिलांसारखे ब्राह्मण होऊन जानवे घालणे, हवन करणे, दलितांचा कैवार घेणे हे एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची साक्ष देते. नायक, पात्रे भले अतिसामान्य असावीत पण वाचकाला ती भावली पाहिजेत. नेमाडेंची पात्रे व त्यांचे चारित्र्य उभारणी त्यामानाने फारच तोकडी पडते.
कथानकातला फापटपसारा जर पात्रांच्या व्यक्तिमत्वात भर टाकत नसेल तर वाचकांच्या दृष्टीने ती निव्वळ खोगीर-भरतीच ठरते व असे अडगळीचे पसारे नेमाडेंच्या हिंदूत ठासून आहेत. जसे, लमाणी स्त्रिया, नामांतर प्रकरण, विद्यापीठातले भ्रष्टाचार, ढाब्यावरची शेरोशायरी, वगैरे. बरे ह्यासर्वांबाबत नायकाचे प्रेम वा द्वेष कुठेच चित्रित न झाल्याने त्याचे व्यक्तिमत्व बाळसे धरत नाही. त्याउलट भैरप्पांची नायिका कॉलेजच्या अनुभवातून, गावकीतल्या अनुभवातून, मंदिरातल्या वादविवादातून, नातेवाईक व मित्रांच्या वागणुकीतून खूपच उंचीने उभी राहते, भावते. ( क्रमश: )

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११
नेमाने-नेमाडे
भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास
स्वगते, भाषणे व संदेश :
बख्तिनने म्हटल्याप्रमाणे सत्य हे नेहमी बहु-आयामी संवादांमध्ये कुठे तरी असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच की काय नेमाडेंच्या "हिंदू" मध्ये अनेक पात्रांचे, नायक खंडेरावाचे व लेखकाची स्वगते, भाषिते ही खूपच मुबलकपणे पेरलेली आढळतात. त्यातली कित्येक भाषिते ही कथानकात विस्तृत केलेली नसतात किंवा लेखकाचे त्यावर अधिकाचे भाष्य असत नाही. जसे: जसा इतिहास पुरातत्व उत्खननाने उघड होतो, तशा जाणिवाही उरलेल्या किंवा उत्क्रांत झालेल्या दिसायला हव्या हे लेखकाचे म्हणणे. विचार म्हणून ह्याचे आकर्षण मान्य केले तरी त्याची विगतवार फोड किंवा विस्तार कुठे लेखक करीत नाही. व मग हे म्हणणे नुसतेच अधांतरी लोंबकळते. वायाच जाते. तसेच "स्त्री ही समाजशास्त्रीय कल्पना की जीवशास्त्रीय ?". ह्यावर बाजूने अथवा विरुद्ध असे कुठलेच स्पष्टीकरण लेखक करीत नाही, किंवा कथानकही त्यावर कृतींनी, प्रासंगिक घटनांनी, प्रकाश टाकीत नाही. हिंदू धर्म बाकी सर्व धर्माच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्या प्रभावाखाली प्रचंड अडगळ निर्माण करणारा झाला असे मलपृष्ठावर व इतरत्र मुलाखतीत लेखकाने म्हटले आहे खरे, पण ह्या कादंबरीत न भाष्याच्या रूपाने वा कथानकातल्या घटना-प्रसंगातून असा काही संदेश वाचकाला मिळत नाही. ज्या राजवाड्यांविरुद्ध नेमाडे संशय व्यक्त करतात (स्टार-माझा मुलाखत), की त्यांनी ज्ञानेश्वरीत स्वत:च्याच ओव्या घुसवल्या असतील त्या राजवाड्यांचा तर (पुस्तकात ) कुठेच उल्लेख येत नाही. ज्ञानेश्वरीत स्वत:च्या ओव्या घुसवण्यासंबंधीही काही भाष्य आढळत नाही. बरे ह्या सर्व गदारोळातून हिंदू समाजाला काही संदेश किंवा मार्ग दाखवलाय असेही मार्गदर्शन पुस्तकात कुठे दिसत नाही. पस्तीस वर्षांच्या खटाटोपातून दिशादर्शक असे काहीच सापडत नाही, हे निश्चित नैतिक भूमिका नसण्याचेच द्योतक आहे.
भैरप्पा "जा ओलांडुनी" कादंबरीचे मर्म सांगतांना म्हणतात: "अवघ्या जातीयतेचा इतिहास काय सांगतोय ? ब्राह्मण व्हायची इच्छा ! कुठल्या मार्गानं का होईना ब्राह्मण म्हणवून घेण्याचा प्रयत्न ! ज्यांनी हे ब्राह्मण्य धिक्कारलं त्यांनीही स्वत:चा एक समूह तयार करून स्वत:ला श्रेष्ठ मानून तेच ब्राह्मण्य वेगळ्या रूपानं आपलंसं केलं. जर सगळेच मूळ ब्राह्मण असते तर त्यामध्ये एवढे वेगवेगळे पंथ-उपपंथ का आले असते ? प्रत्येक समूहानं कसल्यातरी ब्राह्मण्याचाच मुकुट मिरवला. मारम्माच्या पतीनंही असाच, ब्राह्मण होण्याचा प्रयत्न केला होता." हे मर्म जसे लेखक कथानकात पात्रातून त्यांच्या भाष्यातून, कृतीतून जाणवून देतो, त्याचे संगतवार समर्थन करतो तसेच ह्यावरचा उपाय म्हणून प्रत्येकानेच ज्ञानाची कास धरून ब्राह्मण व्हावे, स्वत:चा उद्धार करावा अशी थेट शिकवणही भैरप्पा छान देतात. पृ.२९६ वर असलाच संदेश देणारे एक वचन ते देतात : "कथांवर आधारलेल्या शास्त्राला नीतीचा पाया नसतो. अमुक योग्य आणि तमुक अयोग्य हे नीतीच्या कसावर घासून बघायला पाहिजे, लोकांना ते शिकवायला पाहिजे. माणसा-माणसात भेद करू नये. सगळ्या माणसांच्या शरीरात सारखंच रक्त असतं. " असं काही संदेशपर नेमाडेंच्या पुस्तकात शोधूनही सापडत नाही.
भैरप्पांनी जी निष्कर्षे काढली आहेत त्याला समाजशास्त्रीय अभ्यासातून, निरिक्षणांतून चांगलाच दुजोरा मिळतो. एक हातच्या काकणाला आरसा न लागणारे उदाहरण आहे, सध्याच्या ब्राह्मणांची बदललेली प्रणाली. जेव्हा आरक्षणाचे आधिपत्य सर्वत्र दिसून यायला लागले तेव्हा ब्राह्मणाची मुलेमुली ठराविक चाकोरीतले व्यवसाय सोडून इतरत्र जाऊ लागली. जसे आज राजकारणात, मंत्रीमंडळात, विद्यापीठात, कुलगुरूपदी, कलेक्टर, वगैरे पदांवर ब्राह्मण फारच अभावाने आढळतात. त्याचबरोबर वीस वर्षांपूर्वी अमेरिकेस जाणार्यात प्रामुख्याने ब्राह्मण असत. घरटी एकजण तरी आजकाल अमेरिकेत असतो, संगणकाच्या क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, तांत्रिक क्षेत्रात वगैरे. ज्ञानाची कास न सोडता व्यवसायात असे ते सहजी बदल करू शकले. असाच वरून जातीयतेत ज्ञानाची कास धरून स्वत:चा विकास करून घ्यावा असा सरळ संदेश ठळकपणे दिसून येतो.
नेमाडेंच्या कादंबरीतल्या प्रतिपादनाला अशा अभ्यासाचा काही निर्वाळा दिसून येत नाही. ( अर्थात कादंबरी काल्पनिक असती तर ही गरजही पडली नसती. पण मग नामांतर , विद्यापीठ असली तयार अडगळ टाकता आली नसती !)
तसे पाहिले तर स्वत: नेमाडे ब्राह्मणेतर असून ज्ञानदानाचेच कार्य करतात, त्यावरून ब्राह्मणच ठरतात. ज्ञानाची कास धरणे हेच आजकालचे ब्राह्मण्य ठरते व जे समस्त प्रगती-इच्छुक समाज करीत असतात. वास्तवातल्या काही प्रतिक्रियाही आपल्याला प्रत्यही बघायला मिळतात. जसे "आमचा बाप व आम्ही"चे लेखक डॉ.नरेंद्र जाधव, (जे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्लॅनिंग कमिशनचे सदस्य, शेतकर्यांच्या आत्महत्यावरच्या शोध-समीतीचे एकमेव सदस्य ) एका मुलाखतीत म्हणतात, की शिष्यवृत्त्या, आरक्षण वगैरे ठीक आहेत, पण आम्ही पंढरपूरच्या देवळातले बडवे पुजारी का होऊ शकत नाही. ( आणि त्याउलट त्यांची मुलगी म्हणते, ब्राह्मणांबद्दल माझ्या मनात द्वेष नाहीय.) .इथे भैरप्पांच्या निष्कर्षाची साक्षात प्रचीती येते व त्याची सर्वमान्यता ध्यानात येते.
टीकास्वयंवरात ( पृ.२८९) वर नेमाडे म्हणतात ते त्यांनाच सांगावयाची वेळ येथे येते ती अशी: "...त्या कल्चर ह्या शब्दाचा खरा अर्थ "वाढ" असा आहे. नुसते उगवले त्याची चर्चा करून सांस्कृतिक कार्य होत नाही तर नीट पेरणे, नीट जोपासणे, व विध्वंसक प्रवृत्तींची कीड नष्ट करणे, हे अधिक सांस्कृतिक आहे. तेच अधिक चर्चास्पदही आहे. पुढल्या पिढीने मराठी समीक्षेत क्रांती करून अभिरुचीचे नष्टचर्य संपवल्याशिवाय ह्या परिस्थितीत फरक पडण्याची शक्यता नाही." ( क्रमश: )
---अरुण अनंत भालेराव

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११
भैरप्पा व नेमाडे : एक तौलनिक अभ्यास :
इतिहास व त्याकडे पाहण्याची दृष्टी:
"हिंदू"त इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी संशयाची आहे. पैकी धर्म बिघडवण्याचा दाट संशय ब्राह्मणांवर आहे. पण तो निष्कर्ष म्हणून आणि एक (डिस्कोर्स) भाषण म्हणून येते. कथानकात ब्राह्मण पात्रे व त्यांनी धर्म बिघडवण्याचे केलेले उपद्व्याप असे काही येत नाही. जी निष्कर्षे येतात ती लेखकाची/नायकाची स्वगते, किंवा भाषिते ह्या स्वरूपात येतात.
"जा ओलांडुनी" मध्ये भैरप्पांची नायिकाच ब्राह्मण असते, आजूबाजूची पात्रे लिंगायत, हरिजन, वाणी अशा वेगवेगळ्या जातीची असतात. शूद्राची मातंगी नावाची स्त्री नायिकेच्या वडिलांशी संबंध आलेली बाई असते. तिला ते शेवटी ब्राह्मण करून घेतात. नायिकाही वडिलांनी ब्रह्मोपदेश केला म्हणून जानवे घालते, हवन करते. देवळात सभेत वादविवाद करते. हरिजनाच्या एका पात्राला पूर्वी झालेल्या अत्याचार व छळवणुकीचा इतिहास कागदोपत्रांद्वारे लिहून देते. कादंबरीत जे निष्कर्ष काढलेत की प्रत्येक जात स्वत:ला ब्राह्मण समजण्याचा ( किंवा ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ ) प्रयत्न करते, ते सर्व कथानकातील पात्रे, प्रसंग, संभाषणे समर्थनासारखे सिद्ध करतात. वेळोवेळी इतिहासाबद्दल मते येतात :(पृ.२६८)"एखाद्या उद्देशासाठी त्या दृष्टीनं इतिहास लिहिणं म्हणजे इतिहासाचा दुरुपयोग करणं ह्यावर तिचा विश्वास होता. अभिमानाच्या दृष्टीनंच इतिहास पाहाणं, ठराविक राजकीय किंवा अन्य विचाराच्या पुष्टयर्थ इतिहासाचा क्रम बदलणं किंवा इतिहासाची मोडतोड करणं याला ती बौद्धिक अनीती मानत होती. तिचे प्राध्यापक सांगायचे, जीवनप्रवाह हाच इतिहास आहे. कुठल्याही सिद्धांताच्या उजेडात जीवनाचा शोध घेऊ गेलं तर त्याचा अंत लागत नाही, त्याची नेमकी विशालता समजत नाही--थोडक्यात त्याचं खरं स्वरूपच समजत नाही. सगळे सिद्धान्त जीवनातूनच निर्माण होत असतात. जीवन हाच सत्याचा आधार आहे, सिद्धान्त नव्हे. इतिहासाचही तसंच आहे. सिद्धान्ताच्या नादानं इतिहासही बदलू नये." जेव्हा जेव्हा काही समुदाय ( जसे संभाजी ब्रिगेड, मराठा लॉबी, वगैरे ) आपला इतिहास अभिनिवेशाने बदलायचा किंवा नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना ही दृष्टी लागू होते हे वाचकाला सहजी पटते. ( क्रमश: )

बुधवार, १२ जानेवारी, २०११
भैरप्पा व नेमाडे : एक तौलनिक अभ्यास:
विडंबन विरुद्ध तात्विक बैठक:
"हिंदू" ही नुकतीच प्रचंड खपाची समर्थ कादंबरी लिहिणारे भालचंद्र नेमाडे, समर्थ रामदासांची कशी ससेहोलपट करतात, हे पृ.४५० वर पहा: "रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै...". असा शिष्टाचार आहे की जनमानसात ज्यांना मान आहे अशा संत व्यक्तींना संबोधताना आदरार्थी वचन, भाषा वापरावी.( तुकारामाबद्दल तुम्ही अरे तुरे करणारे लिहून पहा, लगेच शेकडो वारकर्यांची पत्रे येतील. प्रमाण भाषिकांनी जसा बोली भाषिकांचा सहानुभूतिपूर्वक आदर दाखवावा असे नेमाडेंना वाटते, तसेच संतांना आदर दाखवला तर काय बिघडते ? ). पण नेमाडेंनी तर "निश्चित नैतिक" भूमिका घेतलेली. मग ते काय नरमतात किंवा नम्रतात ? पळपुट्या काय नागड्या काय ! मनाचे श्लोकला जनाचे श्लोक करणे, तर खूपच मऊ. बरे समर्थ रामदास एकवेळ ब्राह्मण ( व ब्राह्मणांना सध्या वाईट दिवस म्हणून ) एकवेळ जाऊ दिले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्माचे पुनरुथ्थान केले त्यातल्या गौतम बुद्धाने काय घोडे मारले आहे ? मुलगा झाल्यानंतर बायकोला सोडले, तर स्त्रीवादाचा पुळका आलेल्या नेमाडेंना तो अनादरणीय ? त्यातल्या त्यात एवढे एक बरे आहे की अशी निर्भत्सना नेमाडे एक तंत्र म्हणून का होईना सर्वांचीच करतात. ( अर्थात नेमाडेंचा शूरपणा पहायचा तर त्यांनी मोहमदा संबंधी असे लिहून दाखवावे !).
आता ह्या उलट ह्याच बुद्धाच्या पळून जाण्यावर भैरप्पा काय म्हणतात (पृ.३४० "जा ओलांडुनी") ते पाहू : "बुद्धाची शक्ती केवढी होती ! राज्य आणि भर तारुण्यात बायकोला तो सोडून गेला यात काही फारसं नाही. वुइल पॉवर खरी महत्वाची. माझा हा हात तू यापूर्वीही कितीतरी वेळा पाहिला असशील. किती नरम होता तेव्हा ! आणि आता पहा मी तो कसा केला आहे !"..."तुझ्यामध्ये वुइल पॉवर पहिल्यापासूनच आहे !"..."तुझ्यात का ती नसावी ? यानंतर तरी त्यासाठी तू का प्रयत्न करू नयेस ? कुठल्याही विषयाचा एकाग्र चित्तानं ध्यास घेतला, कुठल्याही विश्वासामध्ये सतत मग्न होऊन राहिलं तर त्याच्या साधनेमध्ये संकल्पशक्ती निश्चित वाढते. अशी संकल्पशक्तीच नसेल तर ते व्यक्तिमत्व तरी कसलं ? " ह्या कथानकाची नायिका एक स्त्री असून ह्या घटनेकडे ती अशा उदात्त विचाराने पाहते हे कदाचित भैरप्पा व नेमाडे ह्यांचे प्रकृतिधर्म वा विचारधर्मच दाखवितात असे ह्या उदाहरणांवरून जाणवते.
सर्वच विचारांचे विडंबन करायचे असे नेमाडेंनी ह्या कादंबरीत, ती व्यवस्थेच्या विरुद्ध असावी, म्हणून असे टवाळी करणारे वर्णन केले असणे साहजिक आहे. त्यामुळे मग रामदासांच्या सर्वच व्यक्तिमत्वाचे विडंबन आवश्यक होते. पण कथानकात नायक स्त्रीवादाच्या समर्थनात हे उदाहरण देतो आहे असे भासवून त्याला तात्विक समर्थन देणे आवश्यक होते. तसा प्रयत्न नेमाडे करीत नाहीत. इथे आठवण होते ती विनोबा भावे ह्यांची, जे गांधींचे शिष्योत्तम होते. हे एके ठिकाणी रामदास, तुकाराम व एकनाथ, ज्ञानेश्वरांच्या संसाराकडे पाहण्याच्या दृष्टिकोणांविषयी म्हणतात : ("विनोबा सारस्वत"संपादक राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन, पृ. ९२ ) : "एकनाथ तुकाराम आणि रामदास यांची एतद् विषयक सर्व वचने विचारात घेतली तर १) संसार आणि परमार्थ यात विरोध आहे--हे प्राथमिक सत्य तिघांनाही मान्य आहे आणि २) संसार आणि परमार्थ एकरूप होऊ शकतो, हे अंतिम सत्यही कोणास नाकबूल नाही. पण
तुकाराम संसारात राहत असूनही परमार्थाशी त्याचा विरोध न विसरणारे;
रामदास संसारापासून अलग राहून अधिकार-भेदाने त्याची परमार्थाशी सांगड घालणारे;
आणि एकनाथ संसार आणि परमार्थ यांतील भेदच मिटवून टाकण्याची हौस बाळगणारे;
असा या त्रिमूर्तीमध्ये वृत्तिभेद दिसतो.
पण एकनाथ आणि रामदास यांच्यातले सर्वात मोठे विचार-साम्य वेगळ्याच गोष्टीत आहे. दोघांनी ज्ञानानंतरही उपासना चालू रहावी याविषयी आग्रह धरला आहे. ज्ञानानंतरही भक्ती असू शकते, हे ज्ञानदेवांनी सप्रमाण सिद्ध केलेले प्रमेय महाराष्ट्रातील एकूण सर्वच संतमंडळींनी कोणी प्रत्यक्ष प्रमाण म्हणून तर कोणी गृहीतकृत्य म्हणून स्वीकारले आहे." कादंबरी हे काही तात्विक चर्चा करण्याचे योग्य माध्यम नव्हे हे खरे असले तरी विडंबनालाच तात्विक चर्चा म्हणून प्रसृत करणे ही घातक प्रथा आहे. भैरप्पा मात्र असे कुठे करीत नाहीत. ( क्रमश: )

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)