बुधवार, ७ सप्टेंबर, २०११
साहित्यिक समीक्षा सिद्धान्त आणि नेमाडेंची "हिंदू"
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"क्रिटिकल थियरी" किंवा "लिटररी थियरी" नावाचा विषय साहित्याच्या उच्च शिक्षणात असतो व असले विषय समजणार्यांभोवती, खरे असो वा खोटे, एक प्रकारच्या आदराचे वलय असते. अशांना उंच ठिकाणी ( जसे सिमला वगैरे ) मानाच्या व चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळतात, ज्यामुळे ते कित्येक वर्षे नवीन साहित्य निर्माण न करता, आपल्या मागील शिदोरीवर मिरवू शकतात. कालांतराने ह्याच साहित्यिक समीक्षा सिद्धान्ता-बरहुकूम ते नवीन साहित्य प्रसवतात व ते सामान्य वाचकाला समजले नाही तरी, ते सिद्धान्त जाणणार्यांच्या उच्च वर्तुळात अति-आदर पावतात, पुरस्कार पावतात. आपण मोठ्या अपेक्षेने अशी पुस्तके विकत घेतो, वाचण्याचा प्रयत्न करतो, आणि न समजल्यावर अशाच वर्तुळातल्या कोणाच्या, मोठेपणाच्या पावतीवर डोलत, शिक्कामोर्तब करतो. आपण हे जसे नकळत करतो त्याविरुद्ध कळून सवरून हे कसोटीचे साहित्यिक सिद्धान्त जाणणारे लोक त्यावर अशी पुस्तके बेततात व मानमरातब पावतात. ह्या मागे जे हे मोलाचे कसोटीचे साहित्यिक सिद्धान्त असतात त्यांची आपण ओळख करून घेऊ व हेच कसे "हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीला लागू होतात ते पाहू. ह्या निमित्ताने कसोटीच्या साहित्यिक सिद्धान्तांची आपल्याला ओळख होईल व ते कसे कलाकृतीला लागू करावेत ह्याचा सरावही होईल. ( ह्या उहापोहासाठी "क्रिटिकल थियरी टुडे" हे इंटरनेटवर उपलब्द असलेले लुइस टायसन ह्यांचे पुस्तक आधाराला घेतलेले आहे . )
साहित्याच्या कसोटीसाठी जे साहित्यिक सिद्धान्त वापरले जातात ते असे असतात : १) मनोविश्लेषणात्मक समीक्षा २) मार्क्सवाद आणि सामाजिकतेची समीक्षा ३) स्त्रीवाद आणि लिंगभेदाची समीक्षा ४) आधुनिकता/न्यू क्रिटिसिझम् वा उत्तर आधुनिकतेची समीक्षा ५) वाचकवादाची समीक्षा ६) संरचनावाद, चिन्हात्मकतेची समीक्षा ७) उत्तर-संरचनावाद / विरचना समीक्षा ८) नव-इतिहासवाद व सांस्कृतिक समीक्षा ९) समलिंगी, गे,व विचित्र समीक्षा १०) आफ्रिकन-अमेरिकन वा वर्णवादाची समीक्षा ११) उत्तर वसाहतवाद. क्रमवारीत थोडयाफार फरकाने हेच मुद्दे श्री.मिलिंद मालशे व अशोक जोशी लिखित "आधुनिक समीक्षा-सिद्धान्त" ( मौज प्रकाशन ) ह्या पुस्तकातही पहायला मिळतात. एखाद्या कलाकृतीकडे वा साहित्याकडे समजूतीच्या सोयीसाठी, लावावयाचे हे जणु चष्मेच असतात, असे म्हणतात. म्हणजे त्या सिद्धान्तापुरते आपण त्याच नजरेने पाहू शकतो व साहित्य जोखू शकतो.
मुळात साहित्य असतेच कशासाठी व ते आपण वाचावे का ? हा आपल्याला पडलेला आदिम सवाल असतो. साहित्य वाचल्याने आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात . असे म्हणतात की आयुष्यात आपण जसजसे ज्यास्त अनुभवी होऊ लागतो, चार पावसाळे ज्यास्त पाहतो, तसतशी साहित्यात अनुभव घेण्याची आपली क्षमता वाढते. वरील समीक्षांचे सिद्धान्त एखाद्या कलाकृतीला लावून, ती कलाकृती फसलेली आहे ( किंवा कसे ), असे दाखविले तरी त्यानिमित्ताने समीक्षा पद्धतीतल्या सिद्धान्ताची आपल्याला ओळख होते. शेवटी प्रत्येक साहित्यिक आपले साहित्य निर्माण करीत असताना त्याच्या दृष्टीने जे अंतिम सत्य वा सुंदर आहे त्याचाच माग काढीत असतो व तो प्रयत्न फसलेला आहे असे समीक्षा-सिद्धान्ताने दिसले, तरी त्यानिमित्ताने सत्य वा सुंदर कसे असते, ह्याची जाण होऊन, आपल्या साहित्यिक अभिरुचीच्या कक्षा रुंदावतात हा फायदाच आहे. तसा तो तुम्हा-आम्हाला होवो !
( क्रमश: १ )
--------------------------------------------------------------------------------------------
मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्त आणि हिंदू :
---------------------------------------------------------------------------------------------------
मनोविश्लेषणात्मक समीक्षा सिद्धान्त इतके आता रुळलेले आहेत की सामान्य जनताही ते जाणते. उदा: खेड्यापाड्यातील लोकही म्हणतात, काय राव वड्याचं तेल वांग्यावर काढताय का ? कोणाचा राग कोणावर काढताय ? आणि मनोव्यापारांचे प्राबल्य आपण इतके कबूलतो की एक रोगी केवळ विलपॉवरने कॅंन्सरला चांगले तोंड देतो तर फाईव्ह-स्टार हॉस्पिटलातही मनाने हरलेला रोगी सहजी दगावतो ह्यात आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. मनोविश्लेषणात्मक सिद्धान्त फ्रॉइड सारख्या डॉक्टराने आपल्या अनुभवातून रूढ केलेले असल्याने ते आजकाल सार्वत्रिक मान्यता पावलेले आहेत. जसे: आपण इच्छांचे दमन करतो, त्यांचे उन्न्यन वा उदात्तीकरण करतो, त्यांचे दुसर्यांवर प्रक्षेपण करतो, त्यांच्या समर्थनासाठी आपले एक खासे बचावतंत्र तयार करतो, ह्यासाठी आता आपण काही पुरावे मागत नाही इतके ते सर्वमान्य आहेत. फ्रॉइडने विस्मृती व स्वप्नकृती ह्यांचेही स्पष्टीकरण बरेचसे पटण्यासारखे दिलेले आहेत. इतर मनोवैज्ञानिक कल्पना आहेत स्थानांतरण ( डिस्प्लेसमेंट ), संक्षिप्तिकरण ( कन्डेंसेशन ), दुसर्या स्तरावरील विस्तृतीकरण ( सेकंडरी इलॅबोरेशन ). फ्रॉइडच्या मोलाच्या कल्पना आहेत जाणीव ( कॉन्शस ) व नेणीव ( अनकॉन्शस ) आणि त्यातही त्याने नेणीवेला ज्यास्त महत्व दिले आहे.
"हिंदू"ला मनोविश्लेषणात्मक समीक्षा लागू करणे अजून एका कारणासाठी प्रशस्त आहे. कारण लेखकाने कबूल केल्याप्रमाणे हे आत्मचरित्रात्मक साहित्य आहे. इतके की त्यातला नायक खंडेराव जिथे राहतो त्या के.बी.देशपांडेंचा बंगला औरंगाबादी मी व अनेक जणांनी पाहिलेला आहे. त्यामुळे इथे लेखक व नायक ह्यांच्यातला आंतरपाट समीक्षेने काढायची गरज न पडता वाचकाला सहजी काढता येतो. मनाच्या अनेक व्यापारांपैकी दुसर्याला इजा ( व्हायलेंस ) करण्याच्या माणसाच्या मूळ प्रवृत्तीचे एक दर्शन घेऊ. वास्तवात नेमाडे हे अपयशी प्राध्यापक होते हे त्यांनी बिढार ह्या कादंबरीतही चित्रित केलेले आहे. त्या चित्रणात त्यांना वर्गात पोरे जी त्रास देतात त्यावर खरे तर एखाद्या अभ्यासू वृत्तीच्या प्राध्यापकाने पब्लिक स्पीकिंग मध्ये नैपुण्य कमव, शिकवण्यातले काही हातखंडे शीक, असा मार्ग अवलंबला असता. पण इथे नेमाडे अगदी सोपा मार्ग अवलंबतात व एका टारगट पोराला वर्गात श्रीमुखात लगावून देतात व त्यामुळे इतर मुले चपापतात, असे नमूद करतात. ही नेमाडे ह्यांची एक सूप्त वृत्तीच झालेली आहे, असे त्यांचे टीकावाङमय वाचून कोणाही चाणाक्ष वाचकाच्या लक्षात येईल. खरे तर वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी नेमाडेंची पहिलीच कादंबरी "कोसला" ही मराठी सारस्वताने वाखाणली, उचलून धरली. त्याने एखाद्याने जरा मवाळ धोरण धारण केले असते. पण नेमाडे चपराक लगावून देण्याच्या वृत्तीचे. त्यांनी टीकास्वयंवरात सर्व प्रस्थापित मंडळींना यथेच्छ बदडून काढलेले दिसेल. अगदी पु.ल.देशपांडेंनाही त्यांनी सोडलेले नाही. वर्गातल्या टारगट पोराला थोबाडीत दिल्यावर जसे सगळे कॉलेज चपापले, तसेच टीकास्वयंवरातल्या घायाळ व चौफेर टीकेने मराठी सारस्वत गळाठले व तेव्हापासून नेमाडे प्रस्थापित "लेखकराव" झाले. नुसती बंडखोरी वेगळी व चपराक लगावणे वेगळे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांचे स्थान अतीव आदराचे असून सर्वच जण त्यांना "माऊली"चा दर्जा देतात. ज्ञानदेवे रचला पाया, असे वारकरी संप्रदाय व भक्तिमार्ग मानतात. ज्ञानेश्वरांनी वर्णव्यवस्थेचे त्या काळात समर्थन केले ह्या दूषणापायी अनेक मान्यवरांनी त्यांच्याशी वाद घातलेला आहे. अलिकडच्या काळात कवी विंदा करंदीकरांनी "अमृतानुभव"च्या अर्वाचीनीकरणाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रदीर्घ वाद घातलेला आहे. पण ज्ञानेश्वरांना चपराक मारण्याचे धारिष्टय फक्त नेमाडेच करू जाणे. कारण हे मूळ स्वभावाने होते आहे. त्याचे हे उदाहरण पहा :"हिंदू" ह्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥. आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो. काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे.काव्यशास्त्रात दृष्टांत अलंकाराची व्याख्या करताना म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर फक्त ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते. शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर निवडून ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा तर "दाब वर येणे" शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही.
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.
ब्राह्मण-द्वेष समाजशास्त्री व मनोवैज्ञानिक एकवेळ रास्त ठरवतीलही. पण लेखकाचा ब्राह्मणद्वेष नायकात, कादंबरीत दिसत नाही. तो महानुभाव पंथाच्या आत्याच्या संन्याशीण होण्याच्या उदात्तीकरणात इतका रंगलेला आहे की तो कादंबरीत ब्राह्मणांची प्रसंगी तारीफही करतो. पण चपराक देण्याची मूळ प्रेरणा लेखक इथे ज्ञानेश्वरांवरही वापरतो. हे मात्र फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाने, मूळ प्रवृत्तीने, झाले असेल असे वाचकाच्या लक्षात येईल. ह्याचे अजून एक उदाहरण आहे, हिंदूची प्रकाशनपूर्व नेमाडेंची मुलाखत. त्यात ते राजवाडेंबद्दल म्हणतात, की हा ब्राह्मण इतका हुशार की ह्याने मूळ ज्ञानेश्वरीची प्रत नष्ट करून, आपल्या पदरच्या ओव्या घुसडल्या असतील. हे लेखकाचे मत, आपल्याला कादंबरीत दिसत नसले, तरी लेखकाचा ब्राह्मणद्वेष मात्र उघड होतो. मनोविश्लेषणात्मक समीक्षा ते उघड करते.
मनोविश्लेषणात उदात्तीकरणाचे जे प्रकरण आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला असा आला. पार्ल्याच्या एका सभेत मी त्यांना विचारले की परंपरेच्या विरुद्ध बंडखोरी करताना तुम्ही "हिंदू" त ज्ञानेश्वरांची खिल्ली उडवलीत, स्त्रीवादाचा कैवार घेत संत रामदासांना नागड्या, पळपुट्या म्हटले, त्याच वादात गौतम बुद्धाला एक पोरगं काढून पळून गेल्याबद्दल दूषणे दिलीत, वारकरी समाजाने महारामांगांना सामावून घेतले नाही म्हणून त्यांना दूषणे दिली, तर हे सर्व तुम्ही बंडखोरीच्या आकर्षणामुळे ( किंवा खपाच्या लोभाने ?) केले असेल हे समजू शकते. पण प्रत्येक बंडखोरीत व्यवस्थेची नवीन व्यवस्था लावण्याचे सामर्थ्य असते असे जे म्हणतात तर त्याप्रमाणे बंडखोरीच्या अभिनिवेषानंतर तुम्हाला कोणती व्यवस्था येणार आहे किंवा आणायची आहे, त्याचे नेमके चित्र काय दिसते ?
त्यावर ते म्हणाले की त्यांची संतांची टर उडवण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण एक सामाजिक संदर्भ देता यावा म्हणून मी हे केले आहे. हे झाले चपराक लगावण्याच्या अनिवार इच्छेचे उदात्तीकरण . व्यवस्थेत बंडखोरी करून पुढचे कुठले पडघम तुम्हाला ऐकू येतात वा दिसतात, ह्यावर ते म्हणाले की मला असे काही दिसत नाही. म्हणजे केवळ चपराक लगावून देऊन आसमंत चपापता करणे हेच मूळ होते, हे मनोविश्लेषणाने दिसते.
चपराक लगावणे ही किती अनावर वृत्ती आहे, हे अजून एका उदाहरणाने दिसेल. नेमाडेंना वारकरी संप्रदायाबद्दल अप्रूप आहे व प्रसंगी त्यांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे. विशेषत: महानुभाव पंथाच्या तुलनेत त्यांच्या मौखिक परंपरेने कसे साहित्य टिकवले हे ते "तुकाराम गाथा" (हे त्यांनी संपादित केलेल्या पुस्तक )च्या प्रस्तावनेत चांगले सांगतात. ह्या वारकरी संप्रदायाला त्यांनी "हिंदू"त मारलेली ही चपराक पहा :"हिंदू त (पृ.४४०):वर : ...पैठण. वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारा-मांगानासुद्धा वारकर्यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरच. विठ्ठ्लाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपुरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून...एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंछ यावनी पदार्थ कसे काय चालतात ? ". महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने वारी करणारा, समानतेचा आदर्श असणारा, हा संप्रदाय. पण स्वत: महानुभावी पंथाचे असलेल्या नेमाडेंना, त्यात वैगुण्यच दिसते. ते सगळ्यांनाच शिव्या देतात, चपराक लगावतात, असा फक्त आव आणतात. कारण पुस्तकात कुठेच नायक असलेला खंडेराव, म्हणजे नेमाडे, महानुभाव पंथाचे काही विश्लेषण का करीत नाहीत ? उलट आत्या महानुभाव पंथाची संन्याशीण असते तिचे किती उदात्त भव्य चित्रण ! मुसलमानांबद्दल का मूग गिळून गप्प ? नायक तर पाकीस्तानात असतो. त्याला भरपूर वाव होता, मुसलमानांना चपराकी ठेवून द्यायला.
( क्रमश: २ )

गुरुवार, २८ जुलै, २०११
देरीदा व नेमाडे :
आपल्याला नेहमी एक कोडे पडलेले असते की , लोक कोणती कादंबरी चांगली व कोणता लेखक दर्जेदार , हे कसे ठरवत असतात ? आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा कोणी तरी एक सन्मान्य परीक्षा घेत असतात व त्यात चांगले मार्क्स मिळाले की आपले लिहिणे "उत्तम" असे ठरते. तशी काही परीक्षा, प्रकाशित कादंबरीला लागू नसते. चांगले प्रकाशक पदरी जाणकार संपादक ठेवतात व त्यांच्या मते लेखन कसे आहे त्याचा आडाखा घेतात. पण ह्या जाणकार संपादकांचा अंदाज सपशेल चुकलेलाही आपण प्रत्यही पाहतो. शिवाय आपण जर स्वत:च कादंबरी प्रकाशित केली, तर मग ती चांगली आहे का नाही, हे कोण ठरवते ? बरे, खपावरून ठरवावे तर खप काय, तुम्ही कसे खपवता, त्यावर अवलंबून असतो. म्हणतात की जगात सगळ्यात ज्यास्त खपलेले पुस्तक "हॅरी पॉटर" हे होते. नंतर एका आनंद नावाच्या बाईने इंग्लंडात "इंडियन फुड मेड ईझी" नावाचे पुस्तक हॅरी पॉटरपेक्षाही ज्यास्त खपवून दाखवले. आता स्वयपाकाचे पुस्तक हे कादंबरीपेक्षा श्रेष्ठ, असा तर अर्थ ह्याने प्रस्थापित होत नाही. मग ज्या पुस्तकाबद्दल ज्यास्तीत ज्यास्त लोक चांगले बोलतात, तशी परिक्षणे देतात ते पुस्तक चांगले असे समजायचे तर, हे सगळे काही लोक घडवून आणतात हेही आपल्याला नंतर कळते. मग चार नावाजलेले लोक ज्याला चांगले म्हणतात ते चांगले असे समजावे असे ठरवू लागलो तर हे लोक आपापले कंपू स्थापून हे घडवून आणतात असेही दृश्य दिसते. आता ह्या सगळ्या अडचणींवर एकच मार्ग उरतो व तो म्हणजे आपण स्वत:च आपल्याला कोणते पुस्तक आवडते ते ठरवावे व तसे तर्काने सांगावे. किंवा बाजारात कोणी कशी लबाडी करून पुस्तकासंबंधी भ्रम पैदा केले त्याचा शोध घ्यावा. लोकांना सांगावे. कदाचित त्यांना ते पटले, तर मग सगळे मिळून ठरवतील की कादंबरी फसली की जमली ?
पुस्तक चांगले आहे असे ठसविण्याचा सध्याचा अजून एक मार्ग म्हणजे प्राध्यापक मंडळींनी आवई उठवायची की कोणा पाश्चात्य तत्ववेत्त्याच्या मतांप्रमाणे, हे पुस्तक असल्याने, ते श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ आत्तापर्यंत "हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीविषयी नावाजलेल्या प्राध्यापक मंडळींनी ज्या कार्यशाळा घेतल्या आहेत, त्यात म्हटले आहे की पाश्चात्य तत्ववेत्ते श्री. देरीदा ह्यांच्या साहित्यविषयक मतप्रणालींनुसार ही कादंबरी असल्यामुळे ती श्रेष्ठच आहे. म्हणजे नुसती "हिंदू" वाचून नव्हे तर हे देरीदा कोण आहेत व ते असे का म्हणत आहेत, हे कळल्याशिवाय आपण काहीच ठरवू शकत नाही.
१९३० ते २००४ दरम्यानच्या काळात ह्या देरीदांनी एकूण ४० पुस्तके लिहिलेली असून त्यांची मते खूपच विवादास्पद होती. तसेच त्यांनी त्या काळातल्या प्रस्थापित तत्ववेत्त्यांच्या विरुद्ध बंडखोरीची मते मांडलेली आहेत. त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात "ऑफ ग्रॅमॅटोलॉजी", "स्पीच ऍंड फिनॉमिना", "रायटिंग ऍंड डिफरन्स ", "मार्जिन्स ऑफ फिलॉसॉफी", "पोझीशन्स" वगैरे मूलभूत विचारांची पुस्तके आहेत. प्लेटो, ऍरिस्टॉटल च्या काळापासून तर्क ( लॉगॉस ), कार्यकारण-भाव हेच मुख्यकेंद्र मानले जायचे. म्हणजे प्रत्येक विचाराला तर्क व विवेक हे केंद्रस्थानी मानल्या जायचे. देरिदांचे म्हणणे की विचार व वस्तूंना हा कार्यकारण-भाव लागू करणे चुकीचे आहे व त्याऐवजी प्रत्येक विचार व वस्तू, भेदक्रीडा करीत असते हेच खरे आहे. म्हणजे गमतीने म्हणायचे तर जसे म्हणतात की प्रत्येक लठ्ठ माणसात बाहेर पडू पाहणारा एक रोड माणूस असतो व प्रत्येक रोड माणसात आत शिरू पाहणारा एक लठ्ठ माणूस असतो, तशा प्रकारचे अंतर्विरोध सगळ्या जगात व्यापलेले असतात. पूर्वी भाषाशास्त्री म्हणत असत की भाषा म्हणजे बोलणे. लिहिणे ही फक्त बोललेल्या शब्दाची टिकवून धरण्याची फक्त एक युगत आहे. आता देरीदांनी ह्याविरुद्ध म्हणणे त्यांच्या बंडखोरीला साजेसेच होते. ते म्हणाले, प्रत्येक बोललेला शब्द हा आधी कधी तरी बोललेलाच असतो, म्हणून तो पुनरावृत्त झालेला असतो. तो केवळ भेदक्रीडा दाखवतो. म्हणजे समजा आपण "कमळ" असे एखाद्या फुलाला म्हटले तर ते इतर फुलांपेक्षा कसे वेगळे आहे हा भेद दाखवणारा शब्द होतो. त्याऐवजी मूळ लेखनात एक चिन्ह दुसर्या चिन्हाचा माग घेत असते व त्यामुळे आज आहे त्यापेक्षा वेगळ्या अर्थाच्या शक्यता मूळ लेखनाच्या संकल्पनेने शक्य होतात. जसे आपण जर म्हटले की "हे मूल आज जन्मलेले आहे" तर इथे जन्म हे चिन्ह "ते मूल कधीतरी मरणार आहे" ह्या "मृत्यू"चा माग काढीत जाते.
"हिंदू" ह्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. ".इथे वेसकराने बुल्ली दाखवणे हे "चिन्ह" सर्वसाधारण समाजात एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला विचारले तर ते तो लक्ष-वेधून-घेण्याची ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) विकृती म्हणून सांगेल. एखाद्या ज्ञानेश्वरीच्या विद्यार्थ्याला विचारले तर तो म्हणेल वर उदधृत केलेल्या ओव्या वेगळ्या संदर्भाच्या आहेत ( शिवभक्तांचा अहंकारही कसा वाईट असतो ते सांगणार्या आहेत ). पण हेच "चिन्ह" समाजातल्या एका गटाने दुसर्या गटावर केलेल्या अत्याचाराची प्रतिक्रिया आहे असा अर्थ देरीदांच्या चिन्हांच्या माग काढण्याच्या गुणांमुळे दाखवता येतो व तो तसा आहे असे लेखक आपल्याला सांगतो आहे. आंतर-जातीय विवाह केल्याने जातीभेदाची झळ कमी होईल असे एखाद्या समाजशास्त्रज्ञाने म्हणावे व त्याच विवाहासंबंधी एखाद्या जात्यंधाने "तुम्ही आमच्या बायका बाटवल्या होत्या म्हणून आता आम्ही तुमच्या बायका बाटवतो आहोत" असे प्रतिक्रिया म्हणून म्हणावे, त्याच प्रकारचे हे लेखकाचे भाष्य आहे. इथे जात्यंधाला असलेली मुभा, देरीदा ह्यांच्या तत्वामागे बेमालूमपणे लपवता येते. एरव्ही जातीय सलोखा ढवळून काढणारे हे भाष्य ठरवून सामान्य प्रतीच्या लेखकाला संपादकाने अडगळीत लोटले असते. पण, देरीदांच्या चिन्हाच्या माग काढण्याचा व तसा अर्थ लावण्याने, "हिंदू" साहित्यिक श्रेष्ठत्वाला नेऊन पोचवते. आपल्याला देरीदा माहीत नसल्याने हे जमले नसते, जे नेमाडेंनी खुबीने जमवले आहे. हीच साहित्यिक श्रेष्ठता !
देरीदा ह्यांचे दुसरे एक तत्व आहे. ते असे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणतीही संहिता ही एकसंध सेंद्रीय अशी नसावी व विविध संहितांचे काही तुकडे एकत्र करून त्यावर कलमे केली तरी चालावे . त्यामुळे संदिग्धता चांगली दाटते व अनेकार्थता साधते. आता देरीदाने सांगितले व नेमाडेंनी नाही केले तर मग काय मजा ? पडत्या फळाची आज्ञा घेऊन, मग नेमाडे "हिंदू"च्या संहितेत, पूर्वीच्या अनेक संहितांचे तुकडे एकत्र करतात. जसे, "कोसला"तला नायक जसा न-नायक होता तसाच "हिंदू"चा नायक अगदी सरळ-साधा, फारसा तडफदार नसलेला, असा आहे. "बिढार"मधल्या नायकाला जसे शिकवता येत नाही, जिंकण्याची कैफ नसते तसाच "हिंदू"चा नायक ठेवलेला आहे. नामांतर चळवळीचे चर्हाट ( चर्हाट ह्यासाठी की समता प्रस्थापित व्हावी म्हणून योजलेले नामांतर समता जवळपासही येणार नाही असे आरक्षून बसले आहे. ), युनिव्हर्सिटीलले भ्रष्टाचार, पांचट झालेले विनोदी चुटके, भाषेवर बलात्कार करून केलेले थिल्लर विनोद ( जसे: मराठीतल्या फक्त ला फकत असे उच्चारणे,), महानुभाव पंथाचे किस्से, वगैरे मसाला ! गालिबचे शेर नेमाडे भरपूर वापरतात. ते मोजले तर एकूण १७ शेर भरतात. मोजताना जाणवले की ते सर्व शेवटाच्या शे-दीडशे पानातच येतात. नायक औरंगाबादीचे वर्णन करताना येतात. गालिबच्या काव्याची थोरवी नक्कीच निर्विवाद आहे. त्याचा वापरही वाचकांना माहीतीचा, सरावाचा, आहे. पण तो संभाषण नाही करीत. शेवटी प्रगट होतो. नायकाचे पाकीस्तानात नोकरी करणे पाहता, ते मुक्त हस्ते सर्वत्र यायला हरकत नव्हती. नायकाचा रेखाटलेला स्वभाव पाहता सर्व कालक्रमणेत असायला हवा होता. पण ते शेर असे एकाच कप्प्यात दिल्याने सह्जी येऊन संवाद करणारे राहात नाहीत. अडगळ करणार्या भरताडासारखे वाटतात. नेमाडेंना बोली भाषा वापरण्याचे आवर्जून अप्रूप आहे. पण वाक्यांची रचना बोली भाषेतली का प्रमाण भाषेतली अशी मोजदाद केली तर प्रमाण भाषेचे पारडे खूपच जड होईल. बोली भाषेचा परिणाम साधण्यासाठी नेमाडे भरपूर लोकगीतात्मक पोवाडे वापरतात. हे स्वरचित असल्यामुळे की काय, काही ठिकाणी संवादाच्या निकडीपायी ते फारच पोरकट होतात. जसे : आमचा मेहुणा नोकरी नो करी..हॉं,हॉं,...तो पीएचडी करी ; क्या बने भात जहॉं, भात बनाये न बने ॥ ; माह्या घराच्या पाठीमागे रे, उंटणी डुलक्या खाये ।; अरे भाग्यवंताची बाईल मरते, अन अभाग्याचा बैल, हो, रामा रे, जी जी ; अरे लभान्यांच्या बाया, नंग्या पोहती रे मासोया, अरे पाटील गांड फाटिल नको लभानीच्या पडू फंदी यारा, दाटील तिची काचोळी तवर सुटील झगारा, ; वगैरे. संतांची वचनेही मुबलकपणे येतात. विनोद, किस्से, पोवाडे, शेर-शायरी, शाब्दिक कोट्या, उत्क्रांतीच्या कथा, यक्षाच्या कथा, संतवचने, कविता, गाण्यांचे मुखडे, हे शैली प्रकार म्हणूनच कादंबरीत सर्वत्र पेरलेले दिसतात. ह्या इतरत्र उपलब्ध असलेल्या संहिता इथे लेखकाने छान कलमे करून कादंबरीत घुसवलेल्या आहेत. पण नायक वा पात्रे ती एकमेकांशी सहजी संवादीत आहेत असे न झाल्यामुळे हीच काय ती "समृद्ध अडगळ" असे जाणवायला लागते. हे खरे तर देरीदांच्या युक्तीमुळे एवढे सोपे "भरतकाम" होते, मग एका "हिंदू" कादंबरीसाठी ३५ वर्षे का लागावी ह्याचे मात्र वाचकाला कोडेच राहते ! कदाचित आमिर-खानचे सिनेमे जसे वर्षातून एकच केलेले असल्याने दर्जेदार असतात असे इंप्रेशन आहे तसे ३५ वर्षात लिहिलेली म्हणून "हिंदू" केवळ कालमापनानेच श्रेष्ठ ठरावी !
देरीदांना अनेकार्थतेचे एव्हढे अप्रूप आहे की कोणताच निश्चित अर्थ नसावा अशी संहिता त्यांना श्रेष्ठ वाटते. ह्याचा प्रत्यय आपल्याला मराठी समीक्षा-व्यवहारात अजूनही येतो तो मर्ढेकरांच्या कवितांबाबत. आज इतकी वर्षे होऊनही मराठी प्राध्यापक-समीक्षक मंडळी अजूनही मर्ढेकरांच्या ५० वर्षापूर्वीच्या कवितांचा नवनवीन अर्थ नित्यनेमाने व अहमहमिकेने काढत असतात, असे आपण पाह्तो. असेच काहीसे धोरण, हे समीक्षक "हिंदू"साठी वापरतात. बंडखोरी म्हणावी तर ह्यातला अत्याचार पाहणारा नायक काहीच बंडखोरीचे काम करीत नाही. रूढ अर्थाने ज्याला यश, संपन्नता म्हणता येईल असेही काही कथानकात नाहीय. कादंबरी ही काल्पनिक निर्मिती असते असे म्हणावे तर लेखक म्हणतो ही कादंबरी ( व त्याच्या इतर सर्व कादंबर्याही ) आत्मचरित्रपरच आहे, म्हणजे घडलेली गोष्ट. स्त्रीवादाचा अपार आदर करण्यासाठी लेखक पारंपारिक साधुसंतांना इथे शिव्यांची लाखोली वाहतो पण त्याचा नायक स्वत: लग्न करण्याच्या विरोधात असतो. असा विरोधाभास सर्वत्र भरून आहे असे आपल्याला वाटते न वाटते तोच देरीदा लेखकाच्या मदतीला असा धावून येतो की ह्यालाच अनेकार्थता म्हणत समीक्षक वाङमयीन महात्मता ह्या कादंबरीला बहाल करू शकतात !
देरीदा हे विरचना ह्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत. विरचनेत काय करतात की कोणत्याही लेखकाच्या संहितेत परस्पर विरोधी भेदक्रीडा असतात असे म्हणून ज्या क्रीडा विरोधी आहेत त्यांना संहितेत उलटे पाडायचे. विवेककेंद्रवादात तर्क, तत्व ह्यांचे अधिष्टान होते तर विरचनेत काही ठाम निश्चित सांगण्याऐवजी "सांगण्यातील" अनिश्चितता वा अनेकार्थता मिरवत राहायचे. ह्याचे प्रात्यक्षिक घेऊ या. नेमाडे हिंदू च्या टीव्ही मुलाखतीत, वा मल-पृष्ठावरच्या ब्लर्बवर काय म्हणतात ? की ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला. बरे हे जर रास्त धरले, तर कादंबरीत ह्यावर काही निश्चित मार्ग सुचवला आहे का ? देरीदा म्हणतात त्याप्रमाणे निष्कर्ष सांगायचा नाही, केवळ अनिश्चितता रंगवत जायची. कादंबरीत प्रतिपादले आहे की ही कसली नाती ? पैशांचा प्रसंग आला की निखळून पडणारी ! पण कथानकात ह्यावर काही मार्ग दाखवलाय का ? नाही ! कादंबरीत स्त्रीवादाच्या स्तोमापायी लेखक संत रामदासांना ते बोहल्यावरून पळून गेले म्हणून पळपुट्या, नागड्या असे शेलके बोलतो. पण मग नायक अथवा लेखक स्त्रीवादाबद्दल काय करतो? तो तर लग्नही करायला तयार नसतो. रामदासांना नावे ठेवायची व नायकाने रामदासांसारखेच वागायचे हीच खरे तर देरीदांच्या भाषेतली भेदक्रीडा ठरावी. ह्यावर लेखक निश्चित असे काही सुचवत नाही. स्वत: नेमाडे टीकास्वयंवर मध्ये म्हणून गेलेत की "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). असे जर निश्चित नैतिक भूमिकेतून वरील विटंबना करणारे लिहिल्या गेले असेल तर नेमाडेंनीच त्याचे उत्तरदायीत्व स्वीकारायला हवे. मतभेद सभ्यतेच्या चौकटीतही ते दाखवू शकले असते. मग ते का दाखवीत नाहीत ? कारण इथेही त्यांना देरीदाच भडकवतो आहे.
विरचनेबाबत प्रा. हरिश्चंद्र थोरात "साहित्याचे संदर्भ"( पृ.९७) वर म्हणतात : "...कुठलाही वि-रचनावादी विचारवंत कोठल्याही संहितेची पूर्ण आणि अंतिम वि-रचना करू शकत नाही. आणि त्याची स्वत:ची संहिताही अंतविरोधांनी युक्त असल्यामुळे वि-रचनेसाठी खुली राहते. अशा परिस्थितीत तो एकच गोष्ट करू शकतो. स्वत:ला भाषेच्या स्वाधीन करून भाषा त्याच्याशी जो खेळ खेळेल त्यात सहभागी होणे. या खेळातून अर्थनिर्मितीच्या अनंत क्षमता निर्माण करत राहणे. अंत नसलेल्या खेळात भाषेच्या हातचे बाहुले झालेला विरचनावादी विचारवंत आणि उपस्थितीच्या अतिभौतिकीच्या प्रभावाखाली असलेला दुसरा एखादा लेखक यांच्यामध्ये फारसा भेद उरत नाही. वि-रचनावादी लेखक हा खेळ खेळण्याचे जाणीवपूर्वक ठरवतो, एवढ्यापुरताच तो भेद मर्यादित राहतो. विरचनेच्या दृष्टिकोणातून हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही त्याचे नसते. तळ नसलेल्या पोकळीतले हे तरंगत राहणे असते ! ". देरीदांच्या ऑर्केस्ट्रावरच्या खाणाखुणातून सिमल्याच्या ऍडव्हान्स्ड संस्थेत भरपूर पगारावरच्या लेखकाने हे नाद वाजवत राहावे, खेळ खेळावेत, हे एकवेळ क्षम्य ठरेल, पण बिचार्या वाचकांच्या नशीबी हे "तळ नसलेल्या पोकळीतले तरंगणे" का यावे ?
-------------------------------------------------------------

रविवार, २९ मे, २०११
बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू": ले: भालचंद्र नेमाडे----४
आता थोडेसे भाषेविषयी व शैलीविषयी पाहू. बख्तिन म्हणतो: (पृ.४७,५०) : "कादंबरीची भाषा ही एक भाषा नसून अनेक भाषांची व्यवस्था असते. ह्या अंतर्व्यवस्थेमुळे त्या एकमेकीशी तात्विकपणे देवाणघेवाण करतात. शैलीमीमांसकांना कादंबरीत, म्हणूनच भाषाप्रकारांच्या खास प्रतिमांचा अभ्यास करावा लागतो. भाषाप्रकारांच्या मिटणे-दिसणे, बंद-चालू होणे, आणि त्यांचे संभाषणात्मक संबंध परिवर्तित होणे हे तपासावे लागते." आता कादंबरीतले एक निरिक्षण: गालिबचे शेर नेमाडे भरपूर वापरतात. ते मोजले तर एकूण १७ शेर भरतात. मोजताना जाणवले की ते सर्व शेवटाच्या शे-दीडशे पानातच येतात. नायक औरंगाबादीचे वर्णन करताना येतात. गालिबच्या काव्याची थोरवी नक्कीच निर्विवाद आहे. त्याचा वापरही वाचकांना माहीतीचा, सरावाचा, आहे. पण तो संभाषण नाही करीत. शेवटी प्रगट होतो. नायकाचे पाकीस्तानात नोकरी करणे पाहता, ते मुक्त हस्ते सर्वत्र यायला हरकत नव्हती. नायकाचा रेखाटलेला स्वभाव पाहता सर्व कालक्रमणेत असायला हवा होता. पण ते शेर असे एकाच कप्प्यात दिल्याने सह्जी येऊन संवाद करणारे राहात नाहीत. अडगळ करणार्या भरताडासारखे वाटतात. नेमाडेंना बोली भाषा वापरण्याचे आवर्जून अप्रूप आहे. पण वाक्यांची रचना बोली भाषेतली का प्रमाण भाषेतली अशी मोजदाद केली तर प्रमाण भाषेचे पारडे खूपच जड होईल. पण नेमाडेंची प्रमाण भाषा कमालीची भारदस्त असल्याने ती शोभा वाढवते. मग बोली भाषेचा परिणाम साधण्यासाठी नेमाडे भरपूर लोकगीतात्मक पोवाडे वापरतात. हे स्वरचित असल्यामुळे की काय, काही ठिकाणी संवादाच्या निकडीपायी ते फारच पोरकट होतात. जसे : आमचा मेहुणा नोकरी नो करी..हॉं,हॉं,...तो पीएचडी करी ; क्या बने भात जहॉं, भात बनाये न बने ॥ ; माह्या घराच्या पाठीमागे रे, उंटणी डुलक्या खाये ।; अरे भाग्यवंताची बाईल मरते, अन अभाग्याचा बैल, हो, रामा रे, जी जी ; अरे लभान्यांच्या बाया, नंग्या पोहती रे मासोया, अरे पाटील गांड फाटिल नको लभानीच्या पडू फंदी यारा, दाटील तिची काचोळी तवर सुटील झगारा, ; वगैरे. संतांची वचनेही मुबलकपणे येतात. विनोद, किस्से, पोवाडे, शेर-शायरी, शाब्दिक कोट्या, उत्क्रांतीच्या कथा, यक्षाच्या कथा, संतवचने, कविता, गाण्यांचे मुखडे, हे शैली प्रकार म्हणूनच कादंबरीत सर्वत्र पेरलेले दिसतात. पण नायक वा पात्रे ती एकमेकांशी सहजी संवादीत आहेत असे न झाल्यामुळे हीच काय ती "समृद्ध अडगळ" असे जाणवायला लागते.
हे मिखाइल बख्तिन कोण आहेत ते थोडक्यात पाहिले तर ते एक रशियन साहित्यिक व तत्ववेत्ते होते ( १८९५ ते १९७५) असे आढळते. ह्यांना मान्यता मरणानंतर मिळाली. १९२० दरम्यान ते "बख्तिन सर्कल" चालवीत पण त्यांना मान्यता १९६० नंतर मिळाली. त्यांचा पीएचडीचा प्रबंध खूपच विवादास्पद झाला व सरकारी हस्तक्षेपानंतर त्यांना पीएचडी नाकारल्या गेली. १९५७ त ते मास्कोत हेड ऑफ रशियन व वर्ल्ड लॅंग्वेजेस होते. ते तत्ववेत्ते का समीक्षक ह्यावर अजून खल होतो. सुरुवातीला रूपवाद्यांना हे जवळचे वाटले तरी शेवटच्या काळात बख्तिनच स्वत:ला त्यांच्यापासून वेगळे समजू लागले. कारण त्यांच्या मते रूपवादी, साहित्यातल्या मजकूराचे(कंटेंट) महत्व कमी करतात व रुपबंधाचे अवडंबर माजवितात. बख्तिनच्या कल्पना अशा : दोन माणसे वाद करीत असतील तर सत्य दोघांपैकी एकाकडे असते असे नसून सत्याला प्रगट व्हायला खूप मते, आवाज/संवाद लागतात. एकाच्या तोंडी सत्य असू शकत नाही. त्याचसाठी कादंबरीत अनेकांचा संवाद असावा, रिओ-द-जानिरोत कार्निव्हलचा जल्लोष असतो तसा मतांचा जल्लोष असावा, मी-माझ्यासाठी, मी इतरांसाठी, व इतर माझ्यासाठी असे एक तत्वज्ञान सांगत ते इतरांचा आपल्यावर कसा परिणाम होतो व त्याचा कसा मान राखावा हे आवर्जून सांगतात. ( इथे नेमाडेंचे एक मुंबईतले नुकतेच केलेले भाषण पहा. नेमाडे म्हणतात, मराठी टिकायची असेल तर आपली मुले मराठीतूनच शिकायला हवी. ज्या राजवाडेंबद्दल नेमाडे प्रमोशन मध्ये म्हणाले होते की हा ब्राह्मण मोठा धूर्त होता व त्याने ज्ञानेश्वरीची मूळ प्रत जाळली व ओव्या पदरच्य़ाच घुसवल्या असतील, त्याच राजवाडेंसारखे नेमाडे इथे मराठीच्या काळजीने बोलत आहेत. हा इतरांचा आपल्यावर होणारा परिणाम असा पाह्यला मिळतो.).
बख्तिनचे रूपबंधाचे मुद्यांबाबत, वर आपण पाहिले की "हिंदू" ह्या नेमाडेंच्या कादंबरीला कसे गैरलागू होतात. बख्तिनची विचारसरणी म्हणजे काही वाङमयीन महात्मतेच्या कसोटयांचा भोज्ज्या नाही, असलीच तर ती एक निरिक्षणाची पद्धत म्हणता येईल. शिवाय कादंबरीकारानेच अथवा त्याच्या चाहत्यांनी हीच कसोटी वापरा (...कादंबरीतलीच एक म्हण वापरायची तर,... मला पहा व फुले वहा...) असे म्हणण्यासारखे आहे. हे सूज्ञ वाचकांची, समीक्षकांची, कोंडी केल्यासारखे होईल. कादंबरीतला मुद्देमाल सामान्य़ पण बख्तिनीय क्लृप्त्या वापरल्याने तो असामान्य होतो, हे कदापी सह्य होणारे नाही. उलट मुद्देमाल कमजोर व रुपबंधांचे रुपडेही ओंगळ असे होते ! ( शिवाय बख्तिनचे ब्रह्मवाक्यही सांगते की सत्य हे क्वचितच एकाच्या मुखी ( नेमाडेंच्या मुखी ) असते.)
अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडियानगर, घाटकोपर( पूर्व) , मुंबई:४०००७७ ;भ्र: ९३२४६८२७९२

रविवार, १५ मे, २०११
बख्तिनचे ओंगळ रुपडे,
हिंदू : भालचंद्र नेमाडे----३
आता कादंबरीत बर्याच ठिकाणी येणारे विनोद, शाब्दिक कोटया, चुटके, किस्से हे पाहू :
(पृ.१३४):आंघोळ करणार्या लभान्यांकडे पहात दोघे जण संवाद करतात: का रे सुदाम्या, दोघीतली कोनती चांगली लागते तुले ? गाय की वासरी ? दुसरा: आपल्यासारख्या न कांडणार्याला काय दोन्ही बोखारे सारखेच.ऊठ शेवटची भाकर टाकाली तव्यावर तुह्या घरात. पहिला: शेवटी आपल्याच घरातल्या तव्यावरची भाकर ऑं ? दुसरा: जे आपली तेच गोड. ("तवा गरम है"वरचे घासून घासून चपटे झालेले जोक, इतक्या प्रतिभावान लेखकाला, पाने भरायला टाकावे लागतात, म्हणजे त्यांचा लेखकरावच झालाय की काय ? का म्हातारपणी "भाकरीची" भूक प्रबळ होते ?)
(पृ.२९८):गांधीजी म्हणतात गरजा कमी करा, पण तो कोण कवी म्हणतो की गरजा जयजयकार. पाने भरण्यासाठी अशा कोट्या म्हणजे गरजवंताला ( पाने भरण्याची गरज ) अक्कल नसते ते खरेच तर !
(पृ.३७२):बोबड्या लेक्चररचे किस्से : साले जहॉंसे अच्छा...लाजाधि लाज....असे पाणचट वाचून वाचकांची बोबडीच वळणार.
(पृ.३९०): तुमची उंची किती, बेलबाला? सटपटून बोलली, चार फिट अकरा उंच...(हाय रे ह्य़ा विनोदाची उंची !)
(पृ.४५७.):युरोपात काय होतं ?...आठशे वर्ष सलग डार्क एजिस---कृष्णयुगं ? ( ---अरेरे असे चातुर्य कामी आले ?)
(पृ.१८३): ...पहा कसे जीएएनडीला पाय लावून... ( हा विनोद जी ए एन डी तच जाणार !)
(पृ.३५७): थंडी कडाक्याची..त्यांचं उठतच नाही तर लोकसंख्या कमी राहणारच...
मुळात गंभीर प्रवृत्तीच्या लेखकाने, ३५ वर्षे खपून लिहिलेल्या गंभीर विषयावरच्या कादंबरीत असले विनोद, कोट्या असाव्यात का ? ( नेमाडे टीकास्वयंवरात पु.ल.देशपांडेंनाही खरमरीत टीकेपासून माफ करीत नाहीत.) तर मग इथे असले विनोद, कोटया कशासाठी असाव्यात ? बख्तिनचे ह्याबाबत काय मार्गदर्शन आहे ? बख्तिन म्हणतो : ( पृ.२३, डायलॉगिक इमॅजिनेशन ):"पात्रांचे वाचकांपासूनचे जे अंतर असते ते हास्य-विनोद कमी करतात. आपण ज्यावर हसतो, ते आपल्या नजीक असते. विनोद-निर्मितीचे सृजन कमाल जवळिकीच्या क्षेत्रात असते. हास्यात अशी शक्ती असते की पात्रे जवळ येतात, ते अशा जाड्याभरड्या संपर्कात येतात की आपण त्यांना उलट सुलट, आत बाहेर, वरून खालून न्याहाळू शकतो. त्यांना उघडे करू शकतो, त्यांची मुक्तपणे पाहणी करू शकतो, त्यांच्याशी नाना प्रयोग करू शकतो. जगाचे असे जवळ आणणे हास्यविनोदाने शक्य होते." पण विनोदाचे दुसरे एक भागधेय बख्तिन सांगत नाही की पुष्कळ वेळा अहमहमिकेने विनोद करू जाता तो हसू आणत नाही, तर आपलेच हसे करतो. आपण विनोदांच्या कार्यक्रमात हे प्रत्यही पाहतोच. विनोद जमणे हे सर्जकतेला म्हणूनच आव्हान असते. आता ३५ वर्ष घेऊन, असे पाणचट विनोद झाले तर ते वैगुण्य आपण बख्तिनचे म्हणू शकत नाही. ह्याचे उत्तरदायीत्व नेमाडेंनाच घ्यावे लागेल किंवा कादंबरी एका बैठकीत लिहावी ( जशी कोसला ) का ३५ वर्षे खपून, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. वाचकांनी हे विनोद हसण्या सारखे आहेत का हास्यास्पद आहेत, हे पहावे.
नेमाडेंच्या सर्वच कादंबर्या आत्मचरित्रपर असतात. त्यामुळे नायकासंबंधी त्यांचे काय व्यूह आहेत हे सहजी उमजून येते. तसेच नायकाची मते, भाषिते, निष्कर्श, आक्रोश, समजूती ह्या सर्व आपल्याला नेमाडेंच्याच आहेत असे मानावे लागते. आपण वर पाहिलेच की टीकाकार म्हणून नेमाडेंना वाटते की नायकाने/लेखकाने काही एक निश्चित नैतिक भूमिका घेऊन कथेत वावरावे लागते. ह्याला बख्तिनचाही पाठिंबा मिळतो तो असा : ( पृ.३८, डायलॉगिक इमॅजिनेशन ): " कादंबरीत नायक वा पात्रे एक आदर्शवादी रूप घेतात व त्याने त्यांची प्रतिमा बदलण्यास मदत होते. पूर्वी हे सॉक्रेटिसच्या प्रतिमेमधून साधल्या जायचे. एक नियम म्हणून सांगता येईल की, कादंबरीत नायक हा बहुतेक करून एक आदर्शवादी असतो." नेमाडेंनी कादंबरीचे नाव दिलेय "हिंदू" व मलपृष्ठावरही सांगण्यात आलेय की हिंदू धर्मातल्या नाना घडामोडींमुळे ह्या धर्मात एक प्रकारची अडगळ साचून राहिली आहे. कादंबरीचे उपशीर्षकच "जगण्याची समृद्ध अडगळ" असे आहे. मग हे कादंबरीत का दिसत नाही. ब्राह्मणांमुळे अडगळ साचली असे कादंबरीत नाहीय, केवळ हिंदू धर्मामुळे नाही तर वैश्विक अशा घडामोडींमुळे सर्वांकडेच अशी समृद्ध अडगळ जमते आहे, ही वस्तुस्थिती आपण जाणतोच. असेच कथानकात आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस असलेल्या पसायदानात लेखकाने वैश्विक भान मागावे व स्वत: कथानकात कोणत्याही समर्थनाशिवाय केवळ हिंदू धर्मामुळे अडगळ साचतेय असा निष्कर्श काढावा ह्यात आदर्शवाद न दिसता साध्या विचारशक्तीची दिवाळखोरीच ज्यास्त दिसून येते. निश्चित नैतिक भूमिकेचे हे कसले समर्थन ? तसा साधा प्रयत्नही दिसून येत नाही. आदर्शवाद दिसणे तर दूरच. शेतकर्याची विदारक परिस्थिती छान रंगवून होते. पण नायकाचा आदर्शवाद त्यावरचा काही मार्ग दाखवत नाही. उलट एक अगतिकताच दाखवतो. वृद्धापकाळी नायकाच्या मुलाने गावी येणार नाही म्हणावे, सोयीसाठी दहिसरला फ्लॅट घ्या म्हणावे व नायकाने तसे करावे ह्यात नेहमी दिसते तशी अगतिकताच, मेलोड्रामा सारखी दिसते. शहरीकरणा विरुद्ध बोलणारा नायक व प्रत्यक्षातला लेखक आनंदाने शहरी होतो, स्त्रिवादापायी समर्थांची, गौतमाची खिल्ली उडवणारा नायक हा स्वत: मात्र लग्न करू इच्छित नाही, आत्यावर झालेल्या वारसाहक्क डावलण्यावर तोडगा काढू शकत नाही, हे अतिशय निराशाजनक आहे व बख्तिनच्या मार्गदर्शनाविरुद्ध आहे. तमाशा कलावंतांच्या जीवनाची ससेहोलपट चालूच रहावी व त्यावरचा नटरंग सिनेमा मात्र खूप चालावा, किंवा शेतकर्यांच्या आत्महत्त्या चालूच रहाव्यात व त्यावरची चित्रणे कादंबरीत छान झाली आहेत असे म्हणावे, ह्यातला विरोधाभास उघड दिसणारा आहे. हे कलेचे यश नाही, निश्चित नैतिक भूमिकेचे निदर्शक नाही, अगदीच डेली सोप च्या वळणाचे मात्र होते. त्याला उदात्ततेचा रंग कसा यावा ? मग कादंबरीला यमुनापर्यटनी म्हणावे का कुठलीच निश्चित नैतिक भूमिका न दिसणारी रीती-प्रधान म्हणावे ?
(क्रमश: )

मंगळवार, १२ एप्रिल, २०११
बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू" : भालचंद्र नेमाडे----२
ज्ञानेश्वरांचा काळ ७५० वर्षांपूर्वीचा. त्यांनी बर्याच प्रसंगी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे, ही बाब खरी असेल. पण हे जे वचन दिले आहे त्याने असा काही अर्थ निघत नाही.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ ह्यात कोठेही जातीव्यवस्थेचा उल्लेख येत नाही वा व्यक्तीश: वेसकरावर काही ताशेरे नाहीत.
आता नेमाडे म्हणतात की हा एक दृष्टांत आहे. काव्यशास्त्रात दृष्टांत हा अलंकार, व्याख्या करताना, म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास, दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. शिवाय ही युगत बख्तिनने कुठेही सांगितलेली नाही. त्याने संवादाबाबत जे सांगितले आहे (की मी-दुसर्यांबरोबर व दुसर्यांना-मी कसा वाटतो ह्या विषयी जे संवाद होतात त्यात कुठे तरी खरेपणा असण्य़ाची शक्यता असते), तसे इथे कुठले संवाद लेखकाने दिलेले नाहीत. फक्त कौतुकाची बाब अशी की नेमाडेंचे "निश्चित नैतिक भूमिकेवर ठाम राहणे" इथे प्रभावी आहे. ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी "स्टार-माझा" वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. अर्थात "न्यू क्रिटिसिझम"च्या विचारप्रणाली प्रमाणे कलाकृतीबाह्य मुलाखतीला आपण महत्व देऊ नये हे खरेच आहे. पण जनसामान्यात आदराचे स्थान असणार्या ज्ञानदेवांवर हे किटाळ आणण्यापूर्वी निदान बख्तिनने असे कुठे सांगितले आहे का असा अदमास तरी त्यांनी घ्यावयास होता. ज्ञानेश्वरांची वा ब्राह्मणांची ही अवहेलना होत असेल तर ते तशी प्रतिक्रिया यथावकाश देतीलच.
आता दोन उतारे घेऊ: ( ते एकत्र घेण्याचे कारण त्यात दोन्हीतही समान धागा आहे.)
पृ.२५३, हिंदू मध्ये हे पहा :"शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस...
पृ.४५० वर पहा:"रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै..."
कादंबरीतले एखादे पात्र समाजाच्या अशा थरातले असेल की जिथे कोणाबद्दलच आदर नाहीय व सगळ्यांना नुसत्या शिव्याच देण्यात येतात तर ते त्या पात्राचे बोल समजायचे का लेखकाचे ? ह्यावर नेमाडेंना आदर असलेल्या बख्तिन ह्यांनी पृ.३३३ ( द डायलॉगिक इमॅजिनेशन ) स्पष्ट असे भाष्य केले आहे, ते असे ( मुक्त भाषांतर): "वैयक्तिक पात्रे आणि त्यांचे भागधेय, आणि वैयक्तिक पात्रांची भाषिते ह्यांची कादंबरीला काही काळजी नसते. पात्रांच्या भाषितांची उठून दिसणारी ओळख अशी की ती भाषिते एका ठराविक सामाजिक वैशिष्टयांची असतात, एक सामाजिक रुंद पदर दाखवतात. अशी भाषिते सूप्त भाषांची दमदार शक्यता दाखवितात. अशा भाषितांमुळे कादंबरीत मतांचे बहु-आवाजी आयाम तयार होतात. ( बख्तिन निरनिराळे लोक जे संवाद करतात त्यात सत्य सापडण्याची शक्यता वर्तवताना ह्या बहु-आवाजी आयामांना महत्व देतो.)."
म्हणजे बख्तिनच्या म्हणण्यानुसारसुद्धा पात्रांची भाषा ही लेखकाचीच भाषा ठरते, व त्या भाषेतल्या वैगुण्याबद्दल, प्रमादाबद्दल लेखकच जबाबदार ठरतो. असेच कादंबरीत लेखकाचे एखादे भाषण (डिस्कोर्स )असेल, तत्वज्ञान असेल, तर ते नायकाचे समजायचे का लेखकाचे ? ह्या विषयीही बख्तिनचे म्हणणे बघण्यासारखे आहे. बख्तिन म्हणतो, ( पृ.३३२):" जी गोष्ट कादंबरीला कादंबरीपण देते व महत्वाची आहे ती म्हणजे, बोलणारी व्यक्ती व त्याचे भाषण. बोलणारी व्यक्ती व त्याचे भाषण, हा कादंबरीतला एक कलात्मक अविष्कार असतो. नाटकात असते तसे हे संभाषण नुसते दिले गेलेले नसते तर, ते लेखकीय भाषण असते. संभाषणाच्या इतर दुय्यम अंगांप्रमाणे ( जसे, काही वेळा गप्प बसणे, घटना, प्रसंगोत्पात बोलणे वगैरे ) ते मोघम नसते तर ते निश्चित असे सांगणे असते व त्यासाठी त्याची भाषा शब्द, व्याकरण हे खास असावे लागते. बोलणारी व्यक्ती म्हणूनच कादंबरीत एक आदर्शवाद्यासारखी असते. हे त्याचे बोलणे जगाकडे पाहण्याचा एक निश्चित दृष्टिकोन दाखवते. म्हणूनच ही भाषिते नुसतीच शब्दांचा केवळ एक दिशाहीन व्यापार न राहता लेखकाचे एक आदर्शवत बोलणे होते." हे नेमाडेंनी टिकास्वयंवर मध्ये कबूलले आहेच. ते असे : "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). असे जर निश्चित नैतिक भूमिकेतून वरील विटंबना करणारे लिहिल्या गेले असेल तर नेमाडेंनीच त्याचे उत्तरदायीत्व स्वीकारायला हवे. मतभेद सभ्यतेच्या चौकटीतही ते दाखवू शकले असते. मग ते का दाखवीत नाहीत ? कारण इथेही त्यांना बख्तिनच भडकवतो आहे. ( अर्थात ते त्यांना अजून उमगले नसावे.).
विडंबन ह्या जुन्या व लोकप्रिय प्रकाराबद्दल बख्तिन म्हणतो,(पृ.५१):"समजा एखाद्या सुनीताचे ( काव्यप्रकार), आपण विडंबन केले तर ते चांगले, वा वाईट असे असू शकते. पण ते त्यातल्या विषयाचे विडंबन न होता, सुनीत ह्या काव्याच्या प्रतिमेचे विडंबन होते"...(पृ.५५,५९,६१):"नालस्ती करणारे विडंबन हे धीरगंभीर एकतर्फी वर्णन करणार्या शब्दातल्या वस्तुस्थितीत किंवा गंभीर शब्दाच्या समीक्षेत खेळकर हास्याद्वारे एक प्रकारचे चूक-सुधारणे करते.धीरगंभीर वाङमय प्रकारात विरुद्ध अर्थाचे हे विडंबन बसत नसल्याने ते कादंबरीत एक प्रकारचे बहु-आवाज ( हेटरोग्लॉशिया ) तयार करते. ह्याच हास्यामुळे कादंबरीला एक महत्वाचा घाट येतो. जेव्हा कोणी एखाद्या विषयावर धीरगंभीर गद्य लिहितो तेव्हा ते त्या विषयाला अर्थ देणारे असल्यामुळे थेट प्रकारचे भाष्य असते. अशाच भाषेत देशाची मिथके, पारंपारिक कथानके तयार होत असतात. ह्या उलट विडंबनाची प्रकृतीच ह्याच्याबरोबर उलटी असते. तिचाही रोख कथानायकाकडेच असतो, पण हास्यामुळे ती वस्तुस्थिती व ते चितारणारे शब्द ह्यात एक अंतर निर्माण करते.सिमित शब्दप्रतिमांनी बंदिस्त केलेले वास्तव मग विडंबनामुळे सत्य वर्तविते."
बख्तिनचा हा सगळा शब्दांचा खेळ आहे. आचार्य अत्रे जेव्हा स.का.पाटिलांचे विडंबन करीत तेव्हा ते एखाद्या काव्यप्रकाराचे, किंवा कॉंग्रेसच्या ध्येयधोरणाच्या टीकेचे नसून चक्क स.का.पाटिलांचीच खिल्ली उडविणारे असायचे. ते शब्दांचा कितीही खेळ करून दाखवू गेले तरी सत्य, एक वाङमयप्रकार, चूक-सुधारणारे वगैरे काहीही न होता सरळ त्यांचीच वैयक्तिक, निंदानालस्ती करणारे असते. किंवा नेमाडेंचे वरचे उदाहरण घेतले तर "सावधान" म्हटल्यावर बोहल्यावरून पळ काढणार्या संत रामदासांनाच नेमाडे पळपुट्या, नागड्या म्हणत आहेत हे उघड आहे. ते काही ब्रह्मचर्य विरुद्ध संसारिक जीवन ह्या परिसंवादात वाद घालीत नाही आहेत. किंवा "तिसरे ते सावधपण । सर्वविषयी ॥"ह्या रामदासांच्या सूत्रासंबंधी विवाद निर्माण करीत नाही आहेत. ते सरळ स्त्रीवादाच्या कैवारापायी समर्थांना वाकुल्या दाखवीत आहेत. तेव्हा बख्तिनच्या कलागतीने, नेमाडेंनी केलेली ही नालस्तीच ठरते. बरे ह्याला काही नैतिक भूमिकेचा संदर्भ द्यायचा असता तर नायक खंडेरावही स्वत: लग्न करण्यास कचरतो आहे हे कसे ? कींवा विवाह ह्या कल्पनेविरुद्ध काही भाष्य असते व मग हे विडंबन असते तर मग बख्तिनचे म्हणणे लागू तरी पडते. किंवा ज्ञानेश्वरांचे वरचे विडंबन हे काही अभंग ह्या वृत्ताचे विडंबन नसून ते त्यांचेच विडंबन होते. एरव्ही ही चक्क बख्तिनच्या आडून केलेली निखालस नालस्तीच होते, अभिरुची सोडून केलेली. ज्ञानेश्वर, गांधी, व समर्थांच्या सेवकांना वक्र दृष्टीची. ( क्रमश: )

शनिवार, १९ मार्च, २०११
बख्तिनचे ओंगळ रुपडे
"हिंदू" : भालचंद्र नेमाडे
मिखाइल बख्तिन ह्यांचे एक पुस्तक आहे, "द डायलॉगिक इमाजिनेशन" ह्या नावाचे. त्यात कादंबरी ह्या प्रकाराचा मोठा आढावा घेऊन काही आडाखे निरिक्षिलेले आहेत. त्या अनुषंगाने भाषाशास्त्रातली काही तत्वेही दिलेली आहेत. ह्या पुस्तकाची ही प्रस्तावना करण्याचे कारण असे की "हिंदू" ही भालचंद्र नेमाडेंची कादंबरी बरीचशी ह्या बख्तिनच्या तत्वांनुसार लिहिली आहे असे जाणवते. (निदान अकादेमीचा पुरस्कार तरी त्यांना ह्याच कारणास्तव मिळणारा असावा !)
एक उदाहरण पहा: उदा: पृ.१५६ वर हे पहा: "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
बख्तिनचे म्हणणे असे की भाषेच्या प्रकारांमध्ये संवाद ह्या प्रकारात अर्थाच्या सर्वात ज्यास्त शक्यता आढळू शकतात. ह्या उतार्यात संवाद असा पारंपारिक प्रकारात दिलेला नाहीय, पण लेखक वा नायक तुमच्याशी संवादच करीत आहे ( "हे कोणाला सांगायचं तरी कसं ?"). त्यानंतर लेखक एक भाषण / ( डिस्कोर्स ) देत आहे, ज्यात तो सांगतो की वेसकराने धोतर वर करून बुल्ली दाखवणे हे ब्राह्मणांनी वेसकरांवर पूर्वी जे अत्याचार केले त्याची प्रतिक्रिया म्हणून "वर आलेला हा दाब" आहे. आता हे सांगतांना अर्थातच संवाद नाहीय, तर निश्चित नैतिक भूमिका घेऊन काढलेले अनुमान आहे. कशावरून हे खरे? तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. पण, जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, मुद्दाम, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा तर "दाब वर येणे" शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. अर्थात भाषाशास्त्रात कोणत्या जातीच्या लेखकांनी कोणत्या जातीच्या लोकांची बदनामी करावी, वा करू नये, ह्याचा काही दंडक नसल्यामुळे जी ती जात बदनामीची सुखदु:खे भोगतील. ( क्रमश: )

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)