बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

सृजन-वेग
प्रगतीची झलक दाखवताना एका पुस्तकात बिल गेटस म्हणतात की दररोज प्रसिद्ध होणारी पुस्तके जर उभी लावली ( म्हणजे त्यांची जाडी मोजली, इंच-मैलात, ) तर इंग्रजी ज्ञानाचा वेग दर ताशी १०० ते १२० मैल भरेल. ह्यालाच मराठी ज्ञानाची तुलना केली तर हा मराठी पुस्तकांचा वेग ताशी ३०-४० मैल भरेल. पुस्तके ही सृजनशक्तीवर चालतात व त्यांचा हा प्रचंड वेग पाहता थक्क व्हायला होते की माणसे किती प्रचंड लिहीत असतात.
सर्जनशीलतेच्या शास्त्रात झटकन लिहून होते ते निर्मितीच्या झटक्यासरशी व ते सहजस्फूर्त असल्याने बर्‍यापैकी असू शकते असे मानतात. म्हणजे सहज रात्री अपरात्री कवीला कविता सुचली, दिसली तर ती त्याने आठवडाभर "र"ला "र", "ट"ला"ट" जोडीत केलेल्या कवितेपेक्षा ज्यास्त चांगली समजतात. कवींना, लेखकांना कधी कधी महिनोन महिने काहीच सुचत नाही. ह्या अवस्थेला "रायटर्स ब्लॉक" किंवा "लेखनाचा बांध" म्हणतात. ह्या वेळच्या त्यांच्या काहीच न सुचण्याला अर्थातच चांगले म्हणता येत नाही.
आता नेमाडेंनी त्यांची पहिली कादंबरी "कोसला" ही वयाच्या पंचविसाव्या वर्षी अवघ्या आठ दिवसात लिहिली म्हणतात. म्हणजे सर्जनाचा वेग किती प्रचंड असेल नाही का ? जर ही कादंबरी ३०० पानांची व प्रत्येक पानावर २५० शब्द धरले तर ७५,००० शब्द आठ दिवसात म्हणजे दिवसाकाठी ९३७५ शब्द होतात. त्याउलट "हिंदू" ही कादंबरी ६०३ पानांची व प्रत्येक पानावर २८० शब्द धरले तर एकूण १,६८,८४० शब्दांची होते. ही कादंबरी नेमाडे म्हणे ३५ वर्षांपासून लिहीत होते. तर हा वेग मोजला तर भरेल दर दिवशी १३.२ शब्द. अवघे १३ शब्द ! हे काय सृजन म्हणायचे का सृजनाचा वांधा ? उन्हाळ्यात कधी कधी आपल्याला उन्हाळी लागते तेव्हा छप्पन्न वेळा बाथरूमला जाऊन अवघे काही थेंब येतात व प्रचंड दाह होतो. ही तर नेमाडेंची सृजन-उन्हाळीच म्हणायची ! फरक इतकाच की उन्हाळी त्यांना व दाह वाचकाला अशी परिस्थिती !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे--१०
देशीवादाचा वृद्धाश्रम
एकेकाळी नेमाडे देशीवादासाठी फार प्रसिद्ध होते. देशीवाद तसा दिसायलाही खूप लोभस असे. पण आज तो कुठे आहे ?
वृद्धाश्रमात जशा सर्वांच्याच कहाण्या साधारण एकसारख्याच असतात तसेच काहीसे नेमाडेंच्या देशीवादाचे झाले आहे.
नेमाडे स्वत: आजकाल भाषणातून मराठीच्या काळजीपायी मुलांना फक्त मराठी माध्यमांच्या शाळातच पाठवा असे म्हणतात. पण ह्यांचे स्वत:चे शिक्षण इंग्रजी ह्या विषयाचेच झाले आहे. देशीवादासंबंधी टीकास्वयंवरात (पृ.१२२) वर ते म्हणाले होते :"आता आपल्या स्वत:च्या भाषासमूहाबाहेर आपण जे जे भाषिक वर्तन करतो त्याला सामान्य दर्जापलीकडे काही महत्व नसते." त्यानंतर ते स्वत:च्या पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे करून घेणार्‍यांची खिल्ली उडवतात. पण प्रत्यक्षात साहित्य अकादेमीच्या पुरस्कारांसाठी त्यांना आपल्याच पुस्तकांची भाषांतरे करून घेणे क्रमप्राप्त ठरते. आता हे वृद्धाश्रमातल्या कहाण्यांसारखेच झाले की !
नेमाडेंच्या "हिंदू" कादंबरीची वाखाणणी करण्यात सध्या एक नवी टूम चालू आहे. हरिश्चंद्र थोरात हे एक कार्यशाळा घेऊन हे सिद्ध करू पाहत आहेत की मिखाइल बख्तिन नावाच्या रशियन समीक्षकाच्या "द डायलॉगिक इमॅजिनेशन" ह्या पुस्तकात दिलेल्या निकषांवरून "हिंदू" ही कादंबरी ही अनन्यसाधारण ठरते. ( म्हणजे हिला मोठ्ठा अकादेमीचा सन्मान द्यावा !). आता स्वत: नेमाडे टीकास्वयंवरात म्हणून गेले आहेत ( पृ.१२३) की "आपण निर्माण केलेली प्रमाणके सोडून इतरांच्या प्रमाणकांचा स्वीकार करता कामा नये". शिवाय मालशे म्हणतात तसे बख्तिन हा काही हिंदू गृहस्थ नव्हता, त्याची प्रमाणके गृहित धरायला.
जे नेमाडे म्हणाले की "पाश्चात्य वेशभूषेचे अनुकरण करणार्‍या पुरोगामी आंतरराष्ट्रीय जीवनपद्धती जगणार्‍या शिक्षितांनी मात्र हा सर्वात सौंदर्यशील जुळणभाग परसंस्कृतीच्या दबावामुळे लज्जास्पद ठरवला" , त्यांना कधी कुणी धोतर कुडत्यात पाहिले आहे काय ? आजकाल तर ते सहा महिने कॅनडा व सहा महिने दहिसर असे रहात असतात. आता ह्यांची तिथली नातवंडे कुठल्या माध्यमाच्या शाळेत जात असतील ते सहजी कल्पना करण्यासारखे आहे. शिवाय "हिंदू" त ते गा‍र्‍हाणे घालतात की तिथे व्हिसा संपला की हाकलून देतात, हे काय बरे आहे का ? तसेच खेडयात राहण्याच्या देशी भावनेचे . स्वत: ते शहरात रहात आले आहेत. पण गुण गायचे खेडयात राहण्याचे.
"हिंदू" कादंबरीत देशीवादाच्या तत्वाविरुद्ध किती तरी उदाहरणे बघायला मिळतात. ज्या गालिबच्या शेरशायरीचे नेमाडेंना खूप अप्रूप आहे, ते काय मराठीत आहेत काय ? तसेच हिंदी सिनेमांच्या गीतांचे उदधृत करणे. मराठी सिनेमात काय गाणी नसतात काय ? तसेच सध्या इंग्रजी कादंबर्‍यात प्रचलित असलेल्या एका युगतीचे. उदाहरणार्थ मायकेल क्रिष्टन ह्यांच्या कादंबर्‍यात कथानकाच्या अनुरूपतेने खूप तांत्रिक माहीती वाचकांना दिलेली असते. जसे जुरासिक पार्क वगैरे. आता हा परदेशीच कल म्हणायचा. मग "हिंदू" त जी भरताड भरती अशी केलीय तिला काय म्हणायचे ? जसे ऍंथ्रॉपॉलॉजीचा एक किस्सा की माणूस आडव्याचा उभा झाला म्हणून भाषेचा जन्म झाला व तो जर पुन: चार हातापायावर रांगायला लागला तर भाषा नष्टही होईल. तसेच वाघ नष्ट होण्याची गोष्ट. गरम तव्याचा जोक, बोबड्या प्राध्यापकाचे बोलणे, स्त्री-दाक्षिण्य हे दक्षिणेच्या लोकांनी आणलेले वैशिष्ट्य त्याचा किस्सा, काही पोरकट कविता, नामांतराचा इतिहासात जमा झालेला सविस्तर भाग, विद्यापीठातले भ्रष्टाचाराचे रडगाणे, वगैरे. म्हणजे पहा, स्वत:च अशी अडगळ पेरायची व छदमीपणे रडायचे कशावर तर "जगण्याची समृद्ध अडगळ". ती ही "हिंदू" धर्मामुळे !
देशीवाद जसा स्वत: नेमाडेंनीच अशा अडगळीच्या वृद्धाश्रमात लोटला आहे तशीच ही कादंबरी अडगळीत व वृद्धाश्रमातच आता पहायला मिळेल !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे---९
स्त्रीवादाचा बुरखा
स्त्रीवादाचा पुळका हे आजकाल एक प्रकारचे "गिव्हन"च असते. स्त्रियांबद्दल धन्योदगार काढणे म्हणूनच एक प्रकारची बांधिलकीच मानावी लागते. हे तोंडदेखलेपण नेमाडे चांगले सांभाळतात जेव्हा ते मोघम म्हणतात की, "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे का जीवशास्त्रीय ?" पण त्यावरचे उत्तर "हिंदू" त् ते कुठेच देत नाहीत. उलट नीट न्याहाळले तर खालील विधानांवरून त्यांची स्त्रियांकडे पाहण्याची ( किंवा बिलकुल न पाहण्य़ाची ) दृष्टी पारंपारिक पुरुषी असल्याचेच दिसून येईल:
(पृ.२६):"मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढ एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. लैंगिकदृष्ट्या लहानपणापासून ह्या बायका मोकाट असल्यानं पुढे काही भीड राहत नाही. व्यभिचाराचीही शक्यता ह्यात गृहित धरली जाते. प्रत्यक्षात लैंगिक अतिचार अशाच बाया करतात."
(पृ.१५७):"...अरे, पण सुईच्या मर्जीशिवाय दोरा जाईल काय ? "
(पृ.२०६):"..ह्या मारवाड्याच्या सारख्या दिसणार्‍या पोरांना गावातल्या शेतकर्‍यांच्या कामानं रंजलेल्या बायका, रे, इकडे ये बरं. तू कोणाचा ? असं विचारायच्या, मग त्यानं बापाचं नाव सांगितलं, की सगळ्य़ा पोट धरधरून हसायच्या. धनमत्सर. "
(पृ.२५७):"गाय आणि बायको---संध्याकाळशी दावणीला पाह्यजे."
(पृ.२६३):"आता दोन राण्याही गेल्या, त्यामुळे हल्ली एकाच बायकोत आवडती आणि नावडती दोघी आलटून पालटून पाहावं लागतं."
(पृ.२८०):"...मला पहा अन फुलं वाहा....लभान्यांनो, सवतीची फुगडी अन फेडा एकमेकीची लुगडी."
(पृ.३४०):" कि अबला वरतारे दाबली नं खाले भलत्याची नार."
(पृ.३४६):"...हे पहा वहिनी, कुलूप एकीकडे अन किल्ली एकीकडे असं चालतं का ?"
(पृ.३९०):"स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनी चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती" हे वाक्य केळ्यांवरून सुचणे हे म्हणजे अश्लीलतेची कमालच.
(पृ.४२२):"..का वं ए नागरगोंडी, लई छाती काढून दबोयती का आम्हले ?....उंदरं खाता साल्या, त्याच्यागुनं पाहा कशा घागरी याहिच्या.." ( स्त्रीपात्रे अशीच ठेवल्यामुळे लेखकाला सर्वत्र पहा कशा इरसाल शिव्या वाहता आल्या आहेत.).
(पृ.४३८):"...गुरुची शिष्या गुरूला फळली..."
(पृ.४५२):"...दक्षिणेतूनच स्त्रीदाक्षिण्य हा शब्द आला असावा..."
(पृ.५३८.):"...बायकोला मी सोडून दुसर्‍यापासून मूल नाही होऊ शकत ?...ही नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे."
कादंबरीचा नायक ब्रह्मचारी दाखविल्यामुळे एक स्त्रीपात्र वाया घालवले आहे. शिवाय जेव्हा तो म्हातारा होतो तेव्हा मुलाशी होणारा बेबनाव लेखकाला महत्वाचा वाटतो पण म्हातारीच्या जाणीवा दाखवण्याचे कटाक्षाने टाळण्यात आले आहे. खंडेरावाच्या लहानपणी बापाची व्यक्तिरेखा रंगविली आहे, पोराच्या डोळ्याच्या जखमेची कणव दाखविली आहे, पण आईचे कोणतेही थोरपण चितारलेले नाही. हे विशेष जाणवण्याचे कारण, लेखक साहित्यिकात फक्त "श्यामची आई" वाल्या साने गुरुजींनाच मानतो, तरीही आईचे थोरपण चितारीत नाही. कादंबरीत स्वत:ची ओळख पटवण्यासाठी वाचकाला स्त्री पात्रेच उपलब्ध नसतील( जी पात्रे आहेत ती लभान्या, रांड, अशा,किंवा महानुभावी आत्यासारख्या संन्याशीण ) तर स्त्रीवाद कसा वाखाणायचा ? अखेरच्या घटकेला दुसर्‍या आत्येवरचा अन्याय दाखवलाय पण नायक त्याचे निराकरण करीत नाही, पारंपारिकतेने म्हणतो, बायकांनी सहनशील रहावे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे---५
वारकर्‍यांवर वार !
नेमाडेंना तुकारामाबद्दल आदर. मौखिक परंपरा, साधी राहणी, एकमेकांच्या पाया पडणे, वारी, ह्यासाठी त्यांना वारकर्‍यांबद्दल प्रेम असावे, असे त्यांच्या आत्तापर्यंतच्या लिखाणावरून वाटते. पण हे काय ?
"हिंदू त (पृ.४४०):वर : पैठण. वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारा-मांगानासुद्धा वारकर्‍यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरच. विठ्ठ्लाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपूरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून...एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंछ यावनी पदार्थ कसे काय चालतात ? "
महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने वारी करणारा हा केवढा समानतेचा आदर्श असणारा हा संप्रदाय. पण स्वत: महानुभावी पंथाचे असलेल्या नेमाडेंना त्यात वैगुण्यच दिसते. ते सगळ्यांनाच शिव्या देतात असा आव आणतात. मग पुस्तकात कुठेच नायक असलेल्या खंडेरावाच्या महानुभाव पंथाचे काही विश्लेषण का नाही ? उलट आत्या महानुभाव पंथाची संन्याशीण असते तिचे किती उदात्त भव्य चित्रण .मुसलमानांबद्दल का मूग गिळून गप्प ? नायक तर पाकीस्तानात असतो.त्याला भरपूर वाव होता.
ह्या नेमाने शिव्या घालण्याच्याच कसबाला दाद म्हणून, नेमाने नेमाडे असा हा प्रतिसाद !
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

प्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवतात ?
"हिंदू" ह्या प्रचंड खपलेल्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ही संत ज्ञानेश्वरांची अतिशय हीन पातळीला जाऊन केलेली बदनामी आहे.
"संतसूर्य तुकाराम" कादंबरीत तुकारामाने तरुणपणी दुकानात आलेल्या पोरींच्या हातावर गोळी ठेवण्याच्य़ा मिषाने स्पर्श केला ( व इतर स्त्रिसुलभ आकर्षण दाखवले ) तर केवढा गहजब झाला. संमेलनाध्यक्षपदही गेले आनंद यादवांचे आणि इथे तर लेखक ह्या वेसकराला ज्ञानेश्वरांना हे काय भलतेच दाखवायला लावतोय. व वर परत फ्राइडचा सिद्धांत, दृष्टांत वगैरे. ह्याचा धिक्कारच व्हायला हवा.
कायदेशीर कारवाईही व्हायला हवी.
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.
ही जाणून-बुजून केलेली चतुराई व बदनामी आहे.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्य़ात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे. इथे हा वेसकर ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते.शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.
शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना". त्यात महानुभावी पंथाचे लेवा पाटील नेमाडे व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच.
प्रति-ज्ञानेश्वर नेमाडेंना एकमेवाद्वितीयतेचा गर्व जरूर व्हावा पण ते माउलींचा असा अपमान करू शकत नाहीत.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
नेमाने नेमाडे---४
नेमाडेंचा ऐसा शिव्या-मस्त-गंडु । देऊनि ठकवे ॥
कायद्याच्या भाषेत कदाचित शिव्या अश्लील ठरत नसाव्यात. नाही तर नेमाडेंच्या ढीगभर शिव्या "हिंदू"त प्रकाशकांनी छापल्याच नसत्या. ह्या शिव्यांचा एक फायदा असा आहे की आजकाल बहुतेक मराठी लोकांची पोरे इंग्रजी माध्यमातून शिकतात, त्यामुळे त्यांना मराठी शिव्या माहीतच नसतात. इथे एवढया भरपूर शिव्या पाहून, आता मराठीचे कसे होणार, ही काळजीच नको. बहुतेक जणांना ६०३ पानांची कादंबरी वाचताना, त्राण ठेवत, काही काही पाने अशीच ओलांडून जावे लागते. ही एक रण-नीतीच जणु. त्यांच्या सोयीसाठी कुठे कोणत्या शिव्या आहेत, त्याची ही जंत्री पहा:
(पृ.२१):येडझवी माणसं , (पृ.३५):मॉंके लौडे , (पृ.४३): मॉंकी च्यूत, मादरचोद , (पृ.४४):माय घातली, (पृ.७५):मॉंकी च्यूत, दोनदा, (पृ.८८):अल्ला,भगवान,भेनचोद कुछ नहीं मांगता आसपास, (पृ.१०६): फोकनीचे, (पृ.१२९):बहीनझू , (पृ.१३०):तोंड नाही तर काय गांड देता ?,(पृ.१५९):तुझ्या आयला , (पृ.१६५): शाटमारी, भडवीच्या, मायझौ , भोसडीच्या, मायबहीनचा झौ, झवाडी रांड, माह्य़ा ल्योक तुही गांड खाये, फोदीचीनं, बोखार्‍यात उंदीर घुसो, (पृ.१६६): माय झौ, झ्याट मारी, मायझवाळ्या, मायचा भोसळा, गांडूच, (पृ.१६९): वायघोडी, बटके, (पृ.१८१):मादरचोदायहो, गांडीत दंडुका खुपसतात, (पृ.२५३):झवाडते, महात्मा गांधीच्या लवडयाचा, बहीनचा झौ, तोंडाची गांड करतूस, (पृ.२५५):झवनं, (पृ.२७०):झाटयाची, भोसडीचे दोनदा, मायची, (पृ.३२९):लांडयांयची ललोपती, (पृ.३४०):मालक मारवाडी, ब्राह्मण संपादक,ठेवल्या जणुं रांडा हो , (पृ.३७७): ह्या दानपत्रात बदल करेल तेयाचिये माये गाढव झविजे, (पृ.३८७.): झाट्याची भावना, गाढवाला लावा गाढव, (पृ.४०८):मायझू, (पृ.४१९): इच्या मायला, मायझौ, (पृ.४२०):बहीनझौ, रांडायहो, (पृ.४२१): झवाडी, (पृ.४२२): नागरमोंडी, (पृ.४३३): बहीनझू, (पृ.४४०):मायझौ, (पृ.४४६):माजला महार कागदाला गांड पुशी, (पृ.४७२): मारू सवर्णांच्या गांडीवर लाथा हो, आमचा बुद्धाच्या चरणी माथा हो , (पृ.४७६): मायला मागून पुढून मारायले मराठवाड्याची, भडवा, दांडू घुसवल्याशिवाय आदत सुधरत नी त्याच्यावाली, (पृ.५०१):झवाडे युवकयुवती, (पृ.५१२):ढुंगणाचं स्वातंत्र्य, (पृ.५१५): प्राचीन ऋषीमुनींच्या थोरवीचं रहस्य : हस्तमैथुन, स्वस्तमैथुन, मस्तमैथुन, (पृ.५४९):तुम्ही बुद्धिजीवी राहा गांडींना पावडरी न अत्तरं लावून छान छोकीत, (पृ.५५१): पाकीस्तानात लांड्यायची लष्करशाही, (प्रु.५५९): नशीब हे असं गांडू--बैलायच्या गांडी पाहायचं .
म्हणतात की अकादेमीचा पुरस्कार मिळवायचा तर एक प्रत हिंदी, इंग्रजीत भाषांतरित करून द्यावी लागते. ह्या शिव्यांची इंग्रजीतली रूपं पहायला काय मजा येईल !
रूपनिर्मितीसाठी म्हणतात बोली भाषेतल्या शिव्याही लिहिणे आवश्यक असते. आता बनी रांड कोणालाही शिव्या घालू शकते. तिने म्हणजे पर्यायाने नेमाड्यांनी " महात्मा गांधीच्या लवड्याचा " असे म्हणणे हे पक्षपाताचे आहे. इतर सामान्य वाचक, कोणाला शिव्या घालू शकत नाही आणि नेमाडे किंवा रांड मात्र...
नेमाडे म्हणतात तसे (पृ.५०५): हागणार्‍याला लाज येत नाही, पाहणार्‍याला लाज येते, तसे आपणच लाजायचे झाले ! ज्यांना शिव्यांचा गंड आहे त्यांना घेऊ दे पुरस्कार !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे--३
राष्ट्रपित्याशी पंगा !
आपल्याच बापाला शिव्या घालायच्या म्हणजे प्रचंड धैर्य लागते. तशी जिगर लागते. पण एकदा बापालाच घाणेरड्या शिव्या हासडल्या की मग कोणी आपल्या वाटेला धजत नाही. मग महात्मा गांधी भले राष्ट्राचे पिता असले तर त्याचे काय हो ?
पृ.२५३, हिंदू मध्ये हे पहा :
"शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस..."
साहित्यिकांना रांडेचे अप्रूप असणे समजू शकते ( कारण बहुतेकांच्या धर्मपत्न्या सोडून गेलेल्या असतात ). पण हे पात्र काही "ब्राह्मणांनी हिंदु धर्म बिघडवला" ह्या मध्यवर्ती "निश्चित नैतिक’ भूमिकेशी फारसे जवळचे नाही. शिवाय कायम हरिजनांचा कैवार घेणारे महात्मा गांधी काही लेवा पाटिलांच्या विरोधातले नव्हते. बरे एखाद्या रांडेने पैसे न देणार्‍या कादंबरीकाराला अशा शिव्या हासडल्या तर ते क्षम्य करता येईल. पण तिने डायरेक्ट महात्मा गांधीलाच हात लावावा हे असंभव व अर्वाच्य !
महात्मा गांधींवर अनेकांनी टीका केलेली आहे. पण ही अगदी खालच्या पातळीची तळ गाठते.
महात्मा गांधींचे चित्र असलेला साहित्य अकादेमीचा पुरस्कार घ्यायला आता नेमाडे मोकळे आहेत !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

समर्थ कादंबरीकार नेमाडे,---रामदासांचा सन्मान करण्यात असमर्थ !
"हिंदू" ही नुकतीच प्रचंड खपाची समर्थ कादंबरी लिहिणारे भालचंद्र नेमाडे, समर्थ रामदासांची कशी ससेहोलपट करतात, हे पृ.४५० वर पहा:
"रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै..."
असा शिष्टाचार आहे की जनमानसात ज्यांना मान आहे अशा संत व्यक्तींना संबोधताना आदरार्थी वचन, भाषा वापरावी. पण नेमाडेंनी तर "निश्चित नैतिक" भूमिका घेतलेली. मग ते काय नरमतात किंवा नम्रतात ? पळपुट्या काय नागड्या काय ! मनाचे श्लोकला जनाचे श्लोक करणे, तर खूपच मऊ. बरे समर्थ रामदास एकवेळ ब्राह्मण ( व ब्राह्मणांना सध्या वाईट दिवस म्हणून ) एकवेळ जाऊ दिले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्माचे पुनरुथ्थान केले त्यातल्या गौतम बुद्धाने काय घोडे मारले आहे ? मुलगा झाल्यानंतर बायकोला सोडले, तर स्त्रीवादाचा पुळका आलेल्या नेमाडेंना तो अनादरणीय व नेमाडे बायकोला सोडून गेले, त्यांचा अमेरिकेतला मुलगा त्यांना विचारेनासा झाला तर ती आत्मनिष्ठा व गौरव करणारी बाब ? हा न्याय खासा नेमाडेपंथी असला तरी धिक्कार करण्या योग्यच ! ब्राह्मणांनी व बुद्ध धर्मीयांनी.
नेमाडेंचा शूरपणा पहायचा तर त्यांनी मोहमदा संबंधी असे लिहून दाखवावे व मग आपण त्यांना मानू . तूर्त धिक्कारूच !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
प्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवतात ?
"हिंदू" ह्या प्रचंड खपलेल्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ही संत ज्ञानेश्वरांची अतिशय हीन पातळीला जाऊन केलेली बदनामी आहे.
"संतसूर्य तुकाराम" कादंबरीत तुकारामाने तरुणपणी दुकानात आलेल्या पोरींच्या हातावर गोळी ठेवण्याच्य़ा मिषाने स्पर्श केला ( व इतर स्त्रिसुलभ आकर्षण दाखवले ) तर केवढा गहजब झाला. संमेलनाध्यक्षपदही गेले आनंद यादवांचे आणि इथे तर लेखक ह्या वेसकराला ज्ञानेश्वरांना हे काय भलतेच दाखवायला लावतोय. व वर परत फ्राइडचा सिद्धांत, दृष्टांत वगैरे. ह्याचा धिक्कारच व्हायला हवा.
कायदेशीर कारवाईही व्हायला हवी.
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.
ही जाणून-बुजून केलेली चतुराई व बदनामी आहे.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्य़ात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.
शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना". त्यात महानुभावी पंथाचे लेवा पाटील नेमाडे व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच.
प्रति-ज्ञानेश्वर नेमाडेंना एकमेवाद्वितीयतेचा गर्व जरूर व्हावा पण ते माउलींचा असा अपमान करू शकत नाहीत.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com